Ganesh Naik : सनसनाटी आरोपानंतर पहिल्यांदाच गणेश नाईक समोर! काय होती पहिली प्रतिक्रिया?
माझ्यावर लावण्यात आलेले सगळे गुन्हे एक प्रकारचं षडयंत्र आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलंय.
नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) हे पहिल्यांदाच जाहीररत्या समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते अज्ञातवासात होते. महिला अत्याचार प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या गणेश नाईकांचे जामीनासाठी प्रयत्न सुरु होते. ठाणे सत्र न्यायालयानं (Court) जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) त्यांना दिलासा दिला होता. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक यांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर ते माध्यमांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर ते पहिल्यादाच जाहिरपणे समोर आले आणि त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांबाबत भाष्य केलंय. माझ्यावर लावण्यात आलेले सगळे गुन्हे एक प्रकारचं षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलंय. आपल्यावरील सर्व आरोपही त्यांनी यावेळी बोलताना फेटाळून लावले. काहींना राजकारण योग्य ते स्थान मिळालं नसल्यानं षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे.
गणेश नाईकांचा रोख कुणाकडे?
गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत गणेश नाईक हे समोर आले होते. आता अटकपूर्ण जामीन मिळाल्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. राजकारण योग्य ते स्थान न मिळाल्यानं काहींनी माध्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गणेश नाईक यांनी केला आहे. विरोधी राजकीय पक्षांवर त्यांनी आरोप करत टीका केली आहे. महिलेनं केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय.
लवकरच सविस्तर बोलणार..
आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर येत्या काळात सविस्तर बोलेन असंही गणेश नाईकांनी यावेळी म्हटलं. अटकपूर्व जामीन दिल्यानंतर हायकोर्टानं गणेश नाईक यांना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टींवर सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आमदार गणेश नाईक अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर प्रथमच मनपा आयुक्तांच्या भेटीला आले होते.
नाईकवर काय आरोप आहेत?
दीपा चव्हाण नावाच्या महिलेनं गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेनं केलेल्या आरोपांनुसार गेली 27 वर्षे नाईक त्यांच्या संपर्कात आणि संबंधात होते. या संबंधातून त्यांना एक मुलगाही आहे. नाईकांनी पीडितेला आश्वासन दिले होते की, मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मी वडील म्हणून त्याला नाव देईन. मात्र, त्यांनी तसे केले नाही. नाईकांनी आम्हाला कोणतेच आर्थिक पाठबळ दिले नाही. नाईक यांच्यासोबत मी पूर्वी संबंधात होते. त्या संबंधातून मुलगा झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर अनेकवेळा जबरदस्तीही केली. माझे लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप पीडित महिलेनं केलेला होता.