Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : आपल्याला लोकांनी केलेलं मतदान गायब झालं, राज ठाकरे यांचा मोठा दावा

Raj Thackeray : "99 ला शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. दोन महिन्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. ज्या काँग्रेसला शिव्या घातल्या. त्यांच्यासोबत महिना दीड महिन्यात युती झाली. या सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या?" असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला.

Raj Thackeray : आपल्याला लोकांनी केलेलं मतदान गायब झालं, राज ठाकरे यांचा मोठा दावा
Raj Thackeray
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 1:48 PM

“या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलय पण ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. तुम्ही असं कुठेही मनात धरु नका, लोकांनी मतदान केलं पण त्यांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले. “अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात” असं राज ठाकरे म्हणाले. “या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली. तेव्हा संघाची राजकीय विंग जन्माला आली. तिचं नाव जनसंघ. हिंदू, हिंदुत्व या गोष्टी ते मांडत आले. त्याचा विषयच येत नाही. 75 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. 77 मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी देशभरात इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला” असं राज ठाकरे म्हणाले.

“इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. मग जनता पार्टी नावाची पार्टी उभी राहिली. त्यात अनेक पक्ष होते. त्यात जनसंघ होते. 1980 मध्ये परत निवडणुका झाल्या. त्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या. त्यावेळी जनसंघाची भारतीय जनता पार्टी झाली. हा भाजपचा झेंडा दिसतो. तो बदलला. जो जनता पार्टीचा आडवा झेंडा होता, भगवा आणि हिरवा हा त्यांनी उभा केला. 80 साली भाजप निर्माण झाली. वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांनी पक्षाची भूमिका बदलली. त्यांनी गांधीवादी समाजवाद ही भूमिका घेतली” असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्यावर सतत भूमिका बदलण्याची टीका होते. त्यावर राज ठाकरे यांनी भारतीय राजकारणातील घटनांवर उदहारणासह स्पष्टीकरण दिलं.

शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती

“1984 साली इंदिरा गांधी गेल्या. 78 मध्ये एक निवडणूक झाली. शरद पवारांचं पुलोद आलं. शरद पवार मुख्यमंत्री झाले. ज्यावेळी पुलोद स्थापन केला तेव्हा जनसंघ पुलोदमध्ये होता. शरद पवारांसोबत” असं राज ठाकरे म्हणाले. “75 पासून काँग्रेसच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. 80 च्या निवडणुकीत शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती. पण शिवसेना आणि काँग्रेसची युती होती. नंतर पवारांचं सरकार बरखास्त केलं. परत 86 मध्ये पवार काँग्रेसमध्ये आले. जनता पक्ष बाहेरच राहिला. मग मराठीच्या मुद्दयावर शिवसेनेच्या हातात पालिका आली” ही आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.

‘ज्या काँग्रेसला शिव्या घातल्या, त्यांच्यासोबत दीड महिन्यात युती’

“86 ची निवडणूक झाली. वाजपेयी भाजपचे अध्यक्षच होते. त्यावेळी पार्ल्यात निवडणूक झाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली गेली. त्यानंतर वाजपेयींना बाजूला केलं. हिंदू हिंदू म्हणून मतदान करू लागला हे भाजपने पाहिलं. संभाजीनगरची निवडणूक झाली. त्यानंतर भाजप शिवसेनेजवळ आली. चर्चा सुरू झाली. 84 मध्ये भाजप शिवसेना युती झाली. सेनेचे दोन उमदेवार कमळावर उभे होते, लोकसभेसाठी. मनोहर जोशी आणि वामनराव महाडीक. 90 ला परत युती झाली. 88 मध्ये पवार मुख्यमंत्री झाले. 95 मध्ये भाजप सेना युतीचं सरकार आलं. आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोकं बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचं सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुमच्या कानात घालणार भूमिका बदलली. भूमिका बदलली. आताच्या पत्रकारांचा किती अभ्यास असतो धन्यच ते” असं राज ठाकरे म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.