Chandrashekhar Bawankule : …म्हणून देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं, काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? VIDEO
Chandrashekhar Bawankule : "शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कृषी सन्मान योजना आणली, तरीही जनतेने काही क्षणांसाठी आमच्यापासून दूर जाऊन जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान केलं" असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“आम्ही संविधान बदलणार हा खोटा प्रचार केला. सर्वत्र खोट पसरवलं. आदिवासी समाजात खोट्या बातम्या पसरवल्या. त्यांचा हक्क काढून घेणार, त्यांच्या अधिकारांवर गदा आणणार. मराठा समाजाला सांगितलं, आम्ही मराठा आरक्षणाविरोधात आहोत. जातीपातीच राजकारण केलं, गोंधळाच राजकारण विजयात बदलल. विकासाच राजकारण आम्ही केलं. पण आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “देशाला पुढे नेण्यासाठी मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला. आम्ही विकसित भारतासाठी मत मागितली” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“इंडिया आघाडीने जातीच राजकारण केलं, त्या आधारावर मत मागितली. हे काही दिवसांसाठी ठीक आहे. प्रत्येक समाजाला समजेल, इंडिया आघाडीने खोट बोलून मत मागितली. हे लोक जातीयवादाच राजकारण करुन जिंकू शकतात. यांच्याकडे सांगण्यासारख विकासाच काम नाही. फक्त नरेटिव्ह सेट करु शकतात” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आता EVM वर का बोलत नाही? असा सवाल बावनकुळेंनी विचारला. “जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होत नाही. विकासाचा राजकारण देशाला पुढे घेऊन जाणार” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
त्यांच्या भावना व्यक्त केल्या
देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, त्यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केलीय, त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते राज्याचे नेते आहेत. पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मोदीजींच्या विकासाच्या योजनांची अमलबजावणी केली” ‘जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान’
“या राज्यात साडेसहाकोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे. प्रत्येकाला घरकुल देण्याच काम झालं. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कृषी सन्मान योजना आणली, तरीही जनतेने काही क्षणांसाठी आमच्यापासून दूर जाऊन जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र भाजपाच्या कोअर ग्रुपने त्यांना विनंती केलीय ते आमची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहून संघटनेच काम करु शकतात. हे भ्रमित, जातीपातीच राजकारण यातून महाराष्ट्र बाहेर येऊन पुन्हा विकासाच्या वाटेवर येईल” असं बावनकुळे म्हणाले