Modi cabinet Expansion: मोदींच्या बैठकीत राणेंना पहिल्या रांगेत पहिलं स्थान, खास फोटोची, खास गोष्ट
दुसऱ्या फोटोत पहिल्या रांगेत नारायण राणेंना स्थान आहे. ते पहिल्या खुर्चीवर आहेत. त्यांच्या बाजुच्या खुर्चीत आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल आहेत. राणेंना दुसऱ्या फोटोत ओळखावं नाही लागत.
काही काही फोटो ऐतिहासिक असतात. असाच एक फोटो सध्या महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संभाव्या मंत्र्यांची बैठक पार पडली. ह्या बैठकीचे फोटो आता समोर आलेत. या फोटोत प्रत्येक जण स्वत:च्या ओळखीचा, प्रदेशातला, भाषेचा, माहित असलेल्या मंत्र्याचा चेहरा शोधतोय. या बैठकीत खरं तर मराठी माणूस महाराष्ट्र शोधतोय. त्यातही चर्चा नारायण राणेंची असेल तर मग त्यांना शोधलंच जाणार.
हे दोन फोटो नीट बघा. यात दोन मराठमोळे नेते स्पष्टपणे दिसतायत. त्यातले एक आहेत नितीन गडकरी जे व्यासपीठावर मोदींच्या बरोबरीनं बसलेले आहेत. त्याच पंक्तीत अमित शाह आहेत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, खुद्द मोदी मध्यभागी आणि त्यांच्या बाजुला संरक्षणमंत्री राजनाथसिंह. त्यांच्याच डाव्या बाजुला निळ्या कुर्त्यात नितीन गडकरी. अर्थात नितीन गडकरी हे भाजपच्या टॉप 5 नेत्यांमध्ये मोडतात. त्यामुळे त्यांची हजेरी आश्चर्यजनक नाही.
Delhi | Prime Minister Narendra Modi’s meet at Lok Kalyan Marg with BJP MPs, ahead of cabinet expansion. pic.twitter.com/ukJJQnW1X4
— ANI (@ANI) July 7, 2021
हेडमास्तरांची शाळा याच फोटोत आणखी एक मराठी नेते आहे. त्यांना पहिल्या फोटोत थोडसं शोधावं लागतं कारण ते पाठमोरे आहेत. ते आहेत नारायण राणे. हेडमास्तरनं शाळेच्या सर्व शिक्षकांचा क्लास घेण्यासाठी बैठक बोलवल्यानंतर जी स्थिती असेल तशीच काहीशी ह्या फोटोत आहे. समोर संभाव्य मंत्री आहेत आणि मोदी गुरुजी, मोठ्या परिक्षेआधी चार ज्ञानाचे त्यांना धडे देतायत असं दिसतंय.
शिस्तीत राणे राणे कुणाचं तरी असं एकदम शिस्तीतल्या मुलासारखं तेही पहिल्या रांगेत बसून ऐकतायत हेच महाराष्ट्राला सुखावणारं आहे. दुसऱ्या फोटोत मात्र राणे स्पष्टपणे दिसतात. फोटो त्यांच्या विरुद्ध बाजूने घेतला गेलाय. पहिल्या फोटो मोदी बसून बोलतायत तर दुसऱ्यात ते माईक घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोत पहिल्या रांगेत नारायण राणेंना स्थान आहे. ते पहिल्या खुर्चीवर आहेत. त्यांच्या बाजुच्या खुर्चीत आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल आहेत. राणेंना दुसऱ्या फोटोत ओळखावं नाही लागत. त्यांचा नेहमीचा कोट इथेही आहे. राणे एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा राजदूताच्या थाटात जास्त दिसतायत. पहिल्या फोटोत ते अमित शाहांच्या समोर दिसतायत. दुसऱ्यात मात्र फक्त मोदी.
अमित शाहांचं कनेक्शन अमित शाह यांनी काही महिन्यांपुर्वीच राणेंच्या सिंधुदुर्गात येऊन त्यांच्या हॉस्पिटलचं उदघाटन केलेलं होतं. त्यावेळेसही राणेंवर शाहांनी स्तुतीसुमनं उधळली होती. आता त्यानंतर राणेंची थेट मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागतेय. याआधी कोकणातून मोदींच्या मंत्रीमंडळात सुरेश प्रभू होते. शिवसेनेचेही नेते होते पण भाजपचे म्हणाल तर प्रभूनंतर राणेच. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलंय. त्यामुळे प्रशासनाचा त्यांच्याकडे अनुभव आहेच. केंद्रातही मोदींना त्यांचा फायदा होईल. महाराष्ट्रातही भाजपला राणेंचा फायदा होईल यात शंका नाही. कारण शिवसेनेला डिवचायला राणेंशिवाय दुसरा कोण असेल?