Mahayuti : शिंदे गटाकडून थेट 7 जागांवर दावा, ‘या’ जिल्ह्यावरुन महायुतीत संघर्ष होण्याची चिन्ह

Mahayuti : महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. पण आतापासूनच जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाने एका जिल्ह्यात 15 पैकी थेट 7 जागांवर दावा सांगितला आहे.

Mahayuti : शिंदे गटाकडून थेट 7 जागांवर दावा, 'या' जिल्ह्यावरुन महायुतीत संघर्ष होण्याची चिन्ह
महायुती
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 12:11 PM

विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपासंदर्भातील बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. अजून कोण कुठल्या जागेवर लढणार ते जाहीर झालेलं नाही. जागावाटपाचा तिढा सोडवणं हेच दोन्ही आघाड्यांसमोरील मुख्य आव्हान आहे.

महायुतीत नाशिक जिल्ह्याच्या जागावाटपावरुन मतभेद होऊ शकतात. नाशिक जिल्ह्यात महायुतीत शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ राहणार का ? असा प्रश्न विचारला जातोय. नाशिकमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागेवरही शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. नाशिक मध्य, नाशिक पश्चिममध्ये भाजपचे तर देवळाली आणि दिंडोरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

जास्त जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच

मालेगाव बाह्य, नांदगाव, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या जागांवर दावा करण्यात आला आहे. जागावाटप होण्यापूर्वीच महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. नाशिकमधील 15 पैकी 7 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्यानं मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.