Nitesh Rane | राणे पितापुत्र गोवा विमानतळावर भेटले? राणे एकटेच कणकवलीत परतले
कालपासून नितेश राणे हे नॉट रिटेबल होते. आमदार नितेश राणे नेमके कुठे आहेत, असा प्रश्ना यानिमित्तानं सगळ्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे हे मुंबईत नसून सिंधुदुर्गात असल्याचा दावा केला होता.
सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि नितेश राणे गोवा विमानतळावर दाखल झाल्याची माहिती हाती येते आहे. नितेश राणे मुंबईत नसून सिंधुदुर्गात असल्याचा दावा नारायण राणेंनी सकाळी केला होता. मात्र आता राणे पितापुत्र गोव्यात असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा विमानतळावर राणे पिता-पुत्र असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गोव्यातून दोघंही पितापुत्र सिंधुदुर्गात मुंबई गोवा हायवेमार्गे सिंधुदुर्गात दाखल होती, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तासाभरानंतर नारायण राणे हे आपल्या कणकवलीतील बंगल्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत यावेळी भाजप आमदार नितेश राणे असल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे नितेश राणे हे जर गोवा विमानतळावर भेटले, तर ते नेमके गेले कुठे, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
जिल्हा सत्र न्यायालयात उद्या दुपारी सुनावमी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंच्या बाजूनं युक्तिवाद करण्यासाठी वकिलांची फौजही सज्ज झाली असल्याची माहिती मिळतेय.
‘तो मुंबईत नाही, सिंधुदुर्गात’
नितेश राणे नेमके आहेत कुठे, असा प्रश्न गेल्या कालपासूनच उपस्थित केला जात होता. नितेश राणे आणि नारायण राणे रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गोवा विमानतळावर दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक होऊ शकते, अशी भीती नारायण राणे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांवरही नितेश राणेंची अटक करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला होता.
कालपासून कुठे होते नितेश?
दरम्यान, आज दिवसभर नितेश राणे हे नॉट रिटेबल होते. आमदार नितेश राणे नेमके कुठे आहेत, असा प्रश्न यानिमित्तानं सगळ्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे हे मुंबईत नसून सिंधुदुर्गात असल्याचा दावा केला होता. मात्र आता नितेश राणे आणि नारायण राणे हे दोघंही गोवा विमानतळावर रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतून गोव्यात आलेल्या विमानानं राणे पितापुत्र दाखल झाले असावेत, असा अंदाज बांधला जातो आहे. उद्या भाजपची जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या या बैठकीला राणे-पितापुत्र उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
अटकेच्या भीतीनं अज्ञातवासात?
सिंधुदुर्गात झालेल्या राड्यात नितेश राणेंचं नाव घेतलं जात असल्यानं नारायण राणेंना याबाबत आज प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नितेश राणें का उसमे कोई भी योगदान नही है, असंही राणेंनी म्हटलं होतं. हे सर्व आरोप सूडाच्या भावनेतून केले जात आहेत, असा पलटवार केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला होता. कसली अटक? काय केलंय नितेश राणेंनी? नितेश राणेनं कुछ भी हरकती किये नही है, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. नितेश राणे अज्ञातवासात आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर नितेश राणे अज्ञातवासात नाहीये. सिंधुदुर्गातच आहेत. ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
पाहा व्हिडीओ – ज्यांच्यावर सिंधुदुर्गात हल्ला झाला त्या संतोष परब यांनी काय सांगितलं?
इतर बातम्या –
UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू
Special Report | नितेश राणेंवरुन जाधव V/s फडणवीस खडाजंगी
Special Report | 280 कोटींच्या नोटांचं घबाड, नोटा पाहून अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले