अजित पवारांच्या 31, चंद्रकांत पाटलांच्या १० कार्यक्रमांचे पुण्यात उद्घाटन

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते आज अनेक नवीन कामांची उद्घाटन होणार आहेत. आज पुण्यात (pune) 31 कामाचे उदघाटन करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे

अजित पवारांच्या 31, चंद्रकांत पाटलांच्या १० कार्यक्रमांचे पुण्यात उद्घाटन
अजित पवार, चंद्रकांत पाटीलImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 7:29 AM

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते आज अनेक नवीन कामांची उद्घाटन होणार आहेत. आज पुण्यात (pune) 31 कामाचे उदघाटन करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, येत्या सोमवारी पुणे महापालिकेची मुदत संपत असल्याने ही उद्घाटन करण्यात येत आहेत. राजकीय ओबीसी (obc) आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांमुळे यंदाची महापालिका निवडणुक काही महिने लांबणीवर पडली आहे.महापालिकेच्या मुदत संपण्यास काही तास बाकी असताना पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी पुण्यात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत.

चंद्रकांत पाटलांच्या 10 कार्यक्रमांचे उद्घाटन

दुसरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुध्दा आज दहा कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या कार्यक्रमाला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात करतील तर चंद्रकांत पाटील सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या कार्यक्रमाला सुरूवात करतील. राजकारणात दोन्ही नेत्यांना दादा म्हणून ओळखले जाते. आज दोन नेत्यांचे कार्यक्रम असल्याने दोन्ही नेते एकमेकांवर टिका करण्याची शक्यता आहे.

अजित पवारांचा असा असेल दिवसभरातील कार्यक्रम 

सकाळी सात वाजता – सुस गाव येथील नाला व रस्ता रूंदीकरणाच्या कामांची पाहणी

सकाळी साडेसात वाजता – वारजे माळवाडी येथे क्रीडा संकुल व क्लब हाऊस- भूमिपूजन समारंभ

सकाळी आठ वाजता – वारजे येथे सुभदा प्रभाकर बराटे मल्टिस्पेशालिटी व मॅटर्निटी रूग्णालयास सदिच्छा भेट

सकाळी साडेआठ वाजता- शिवणे येथे शिवणे-नांदेड पूलाचा उद्घाटन समारंभ व विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन

सकाळी नऊ वाजता – कात्रज डेअरी सरहद शाळा चौक येथे कात्रज डेअरीमधून जाणारा २४ मीटर सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ रस्ता लोकार्पण सोहळा

सकाळी पावणे दहा वाजता – राजीव गांधी नगर बालाजी नगर, पुणे येथे स्व. माणिकचंद नारायणदास दुगड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा

सकाळी १०:२५ वाजता – सुखसागर नगर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा १) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम क्रीडा संकुल २) पोलीस चौकी ३) महिला बचत गट कार्यालय ४) कै. किसनराव माऊली कदम उद्यान प्रयाण

सकाळी ११ वाजता मिठानगर, कोंढवा खुर्द, येथे १) माँ खदीजा (र.अ.) प्रसुतिगृहाचा लोकार्पण सोहळा २) हजरत अब्दुल रहेमान (रहे) ओटा मार्केटचा लोकार्पण सोहळा

सकाळी ११:४५ वाजता- कौसर बाग येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम १) डॉ. सय्यदना मोहम्मद बुराउद्दीन उद्यान २) ‘बाग जन्नत’ कब्रस्तान ३)मुख्य भैरोबानाला ते एन.आय.बी.एम परिसर मलवाहिनी

दुपारी १२.३० वाजता वानवडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन / लोकार्पण सोहळा १) ४५ फूट उंच राष्ट्रध्वज भूमिपूजन २) १०० बेडचे रूग्णालय ३) बॅडमिंटन हॉल लोकार्पण

दुपारी १.१५ वाजता ११० रामटेकडी, प्रभाग क्र. २४ येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा – १) पंचशील बुद्ध विहार २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

दुपारी तीन वाजता – कृषिभवन, शिवाजीनगर येथे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव कार्यक्रमास भेट

दुपारी ४:१० वाजता – पंचशील चौक, ताडीवाला रोड, पुणे येथे आगमन नूतनीकृत शिल्पाचे लोकार्पण

दुपारी ४:३० वाजता – प्रभाग क्र. फुलेनगर-नागपूर चाळ, आळंदी रोड येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन

सायंकाळी सव्वापाच वाजता – धानोरी जकात नाका, धानोरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन १) राजयोग मेडिटेशन सेंटर २) अग्निशामक केंद्र ३) माजी सैनिक सांस्कृतिक भवन ४) भव्य उद्यान

सायंकाळी सहा वाजता – वडगांव शिंदे रोड, लोहगाव, येथे ‘ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल’ भूमिपूजन सोहळा

सायंकाळी ६:५० वाजता – प्रभाग क्रं. ३, खराडी, येथेऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन व सभा

दिवसभर घरीच असेल कधीही या, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट; पोलीस सागर बंगल्यावर येऊन चौकशी करणार

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी कुणाची? काँग्रेस कार्यकारणीची उद्या बैठक, गांधी परिवार राजीनामा देणार?

Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा पुतिन यांना चर्चेचा प्रस्ताव, आता तरी विध्वंस थांबणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.