आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात, भायखळ्यात शिवसेनेला धक्का?

शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.

आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात, भायखळ्यात शिवसेनेला धक्का?
शिवसेना आमदार यामिनी जाधव
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 8:54 AM

मुंबई : शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव (Yamini Yashwant Jadhav) अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आयकर विभागाचं म्हणणं आणि मागणी काय?

2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचंही आयकर विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधवांनी कोणती माहिती दिली होती?

2019 च्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये 2.74 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं होतं. तर पती यशवंत जाधव यांच्या नावावर 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये 1.72 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

कोण आहेत यामिनी जाधव?

यामिनी जाधव भायखळा विधानसभआ मदतारसंघाच्या आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव केला होता प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

(income tax Department Allegation Shivsena byculla MLA yamini jadhav Incorrect information in Election affidavit )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.