रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. (independent mla to minister, know about Rajendra Patil Yadravkar)

रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
Rajendra Patil Yadravkar
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:47 PM

मुंबई: शिरोळचे अपक्ष आमदार आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना महाविकास आघाडीसोबत न जाण्याबाबत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी धमकावल्याचं उघडकीस झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला या अडचणीत आल्या आहेत. कोणत्याही वादात नसलेले यड्रावकर कोण आहेत. त्यांची राजकीय कारकिर्द कशी आहे? यावर टाकलेला हा प्रकाश. (independent mla to minister, know about Rajendra Patil Yadravkar)

कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्रिपद यड्रावकर यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात

राजेंद्र यांची राजकीय वाटचाल विद्यार्थीदशेपासून सुरू झाली. त्यांनी एनएसयूनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर यड्रावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. एनएसयू आयचे शिरोळ तालुका अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे संघटन सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी महासचिव, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

पहिली निवडणूक आणि सामाजिक कार्य

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा जन्म 5 मे 1970मध्ये झाला. त्यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा घेतलेला आहे. त्यांनी वयाच्या 26 व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली आणि 1991-92मध्ये जयसिंगपूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडूनही आले. वयाच्या 32व्या वर्षी त्यांच्याकडे शरद सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद आलं. ते पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष आहेत. पार्वती सहकारी सूत गिरणीचेही ते अध्यक्ष आहेत. पद्मावती यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स, पार्वती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आदी असंख्य संस्था, संघटनांचे ते अध्यक्ष आणि चेअरमन आहेत.

20 वर्षानंतर स्वप्नपूर्ती

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे वडील स्व. शामराव पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील विकासात मोठं योगदान दिलं होतं. राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहून शिरोळ तालुक्यातील सहकार, सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रात काम केलं. पण त्यांचे दोनदा आमदारकीचं स्वप्न भंगलं. राजेंद्र यांच्याही पदरी दोनदा निराशा आली होती. मात्र, राजेंद्र यड्रावकर यांनी 2019मध्ये राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. सातत्याने केलेली विकास कामे, दांडगा लोकसंपर्क आणि कठोर मेहनत यामुळे ते विजयी झाले. वडिलांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते पंधरा ते वीस वर्षे प्रयत्न करत होते. अखेर त्यात यश आलं. दूधात साखर म्हणजे ते नुसतेच आमदार झाले नाहीत, तर नामदारही झाले.

शिवसेनेला सर्वात आधी पाठिंबा

शिरोळमधून अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर यड्रावकर यांनी सर्वात आधी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र, अपक्ष आमदार असूनही केवळ राष्ट्रवादीवरील निष्ठेपायी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घेतला आणि मगच शिवसेनेला पाठिंबा दिला. सर्वात आधी पाठिंबा देणाऱ्या यड्रावकरांचा शिवसेनेने आपल्या कोट्यातून राज्यमंत्रीपद देऊन त्यांचा यथोचित सन्मानही केला.

शिरोळचे दुसरे मंत्री

यड्रावकर यांच्या रुपाने शिरोळ तालुक्याला तब्बल 40 वर्षानंतर दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले. त्यापूर्वी रत्नप्पाण्णा कुंभार हे मंत्री होते. कुंभार यांच्यानंतर शिरोळच्या वाट्याला मंत्रिपद आलंच नव्हतं.

लकी नंबर

कै. शामराव अण्णा यांनी शिरोळ तालुक्यात सहकारावर मोठा भर दिला होता. यावेळी त्यांनी रोजगार निर्मिताचा ध्यास घेतला आणि त्यासाठी कारखाना काढण्याचा निर्णय घेतला. बघता बघता कारखाना उभा राहिला. याच काळात त्यांनी चारचाकी गाडी घेतली होती. त्या गाडीचा नंबर होता 9889. गाडी आली कारखानाही उभा राहिला. गाडीचा नंबर लकी असल्याचं त्यांना वाटलं आणि त्यानंतर घरात याच नंबरची प्रत्येक गाडी आली.

बिनविरोध निवडणूक केल्यास 50 लाख

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. निवडणुका झाल्यास गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती असल्यानेच त्यांनी निवडणुका टाळण्यासाठी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावांना 50 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक आमदारांनी यड्रावकरांचा कित्ता गिरवला होता. (independent mla to minister, know about Rajendra Patil Yadravkar)

शुक्लांचा दबाव

2019मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी यड्रावकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहण्यासाठी दबाव टाकला होता. यड्रावकर यांनी भाजपला पाठिंबा द्यावा म्हणून शुक्ला यांनी त्यांना फोन करून त्यांच्यावर दबावही टाकला होता. तशी माहितीच यड्रावकर यांनी दिली. या गोष्टीची कल्पना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली होती, असंही त्यांनी सांगितलंय. (independent mla to minister, know about Rajendra Patil Yadravkar)

संबंधित बातम्या:

‘ठाकरें’ना अटक ते ‘ठाकरें’च्या मंत्रिमंडळात; भुजबळांचा झंझावात माहीत आहे का?

वडील गिरणी कामगार, चाळीत बालपण गेलं; चंद्रकांतदादांविषयी हे माहीत आहे का?

आईची मृत्यूशी झुंज, तरीही कोरोना काळात जनतेसाठी रस्त्यावर; जाणून घ्या, राजेश टोपेंविषयी!

(independent mla to minister, know about Rajendra Patil Yadravkar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.