INDIA Alliance press conference : महाराष्ट्रात मविआ इतक्या जागा जिंकणार, काँग्रेस अध्यक्षांचा मोठा दावा
INDIA Alliance press conference : . महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? या बद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोठा दावा केला आहे. "महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणार. शेतकऱ्यांच्याा साहित्यावर जीएसटी हटवणार" या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
“महाराष्ट्रात महायुती सरकार बेकायद पद्धतीने बनलय. यात धोका, कारस्थान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारच समर्थन करतात. पंतप्रधान मोदी कुठेही गेले, तरी ते लोकांमध्ये फूट पाडण्याच काम करतात. कदाचितच असं कुठल्या पंतप्रधानाने केलं असेल” असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला. आज इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे, शरद पवार असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. “मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. विश्वासघाताचा राजकारण सुरु आहे. मोदी सरकार संविधानाचा दुरुपयोग करत आहे. धमकी, बॅल्कमेल, आमिष दाखवून विरोधी पक्ष फोडले जात आहेत” असे आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
“खऱ्या पक्षांकडून निवडणूक चिन्ह काढून भाजपाच समर्थन करणाऱ्या गटांना दिलं जात आहे. या सर्व गोष्टी मोदींच्या इशाऱ्यावरुन सुरु आहेत, यात दुमत नाही. ते बोलतात तेच होतं, पण यावेळी इलेक्शन मध्ये हे होणार नाही. ही जनतेची लढाई, जनता लढतेय. या लढाईत जनताच जिंकणार. यांच्या कारनाम्यावर लोक नाराज आहेत. लोकशाहीची बद्दल ते वारंवार बोलतात पण लोकशाहीने चालत नाही” असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
मविआ किती जागांवर विजय मिळवले असा दावा?
“महाराष्ट्रात 2 वर्षांपासून पालिका निवडणूका झालेल्या नाहीत. मोदी आल्यानंतर मुंबईकडे दुर्लक्ष केलं. बुलेट ट्रेनही लवकर येणार नाही” असं खरगे म्हणाले. “महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणार. शेतकऱ्यांच्याा साहित्यावर जीएसटी हटवणार” या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यात महाविकास आघाडी कमीत कमी 46 जागांवर विजय मिळवेल असा मोठा दावा खरगे यांनी केला.