महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून मतदान, 23 मे रोजी निकाल
Loksabha Election 2019 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान दुसरा टप्पा –18 एप्रिलला […]
Loksabha Election 2019 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार असून, 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली.
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार
- पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
- दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
- तिसरा टप्पा – 23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 जागांसाठी मतदान
- चौथा टप्पा – 29 एप्रिलला महाराष्ट्रात 17 जागांसाठी मतदान
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल 7 जागांसाठी मतदान – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार – गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ- वाशिम
महाराष्ट्र – दुसरा टप्पा –18 एप्रिल 10 जागांसाठी मतदान – बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
महाराष्ट्र- तिसरा टप्पा – 23 एप्रिल 14 जागांसाठी मतदान – जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
महाराष्ट्र- चौथा टप्पा – 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई
पहिला टप्पा – 11 एप्रिलला महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान
- अर्ज भरण्याची तारीख – 18 मार्चपासून
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च
- अर्ज छाननी – 26 मार्च
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 28 मार्च
- मतदानाची तारीख – 11 एप्रिल
- निकाल – 23 मे
दुसरा टप्पा –18 एप्रिलला महाराष्ट्रात 10 जागांसाठी मतदान
- अर्ज भरण्याची तारीख – 19 मार्चपासून
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 26 मार्च
- अर्ज छाननी – 27 मार्च
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 29 मार्च
- मतदानाची तारीख – 18 एप्रिल
- निकाल – 23 मे
कुठल्या टप्प्याचं कधी मतदान :
- पहिला टप्पा- 11 एप्रिल
- दुसरा टप्पा – 18 एप्रिल
- तिसरा टप्पा – 23 एप्रिल
- चौथा टप्पा – 29 एप्रिल
- पाचवा टप्पा – 6 मे
- सहावा टप्पा – 12 मे
- सातवा टप्पा – 19 मे
कुठल्या टप्प्यात किती मतदारसंघात मतदान?
- पहिला टप्पा – 91 सीट (20 राज्य)
- दुसरा टप्पा – 97 सीट (13 राज्य)
- तिसरा टप्पा – 125 सीट (14 राज्य)
- चौथा टप्पा – 71 सीट (9 स्टेट्स)
- पाचवा टप्पा – 51 सीट (7 राज्य)
- सहावा टप्पा – 59 सीट (7 राज्य)
- सातवा टप्पा – 59 सीट (8 राज्य)
टप्पानिहाय देशभरातील मतदान :
पहिला टप्पा (11 एप्रिल) – आंध्र सर्व 25 जागास, अरुणाचल 2, आसाम 5, बिहार 4, छत्तीसगड 1, जम्मू काश्मीर 2, महाराष्ट्र 7, मणिपूर 2, मेघालय 2, मिझोराम 1, नागालँड 1, उडिसा 1, सिक्कीम 1 , तेलंगाणा 17, त्रिपुरा 1 , उत्तर प्रदेश 8, उत्तराखंड 5, प बंगाल 2., अंदमान निकोबार 1, लक्षद्विप 1 – 11 एप्रिल
दुसरा टप्पा (18 एप्रिल) – आसाम 5, बिहार 5, छत्तीसगड 3, जम्मू काश्मीर 2, कर्नाटक 14, महाराष्ट्र 10, मणिपूर 1, उडिसा, 5, तमिळनाडू 39, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 8, प. बंगाल 3, पुदुचेरी
तिसरा टप्पा (23 एप्रिल) – आसाम 4, बिहार 5, छत्तीसगड 7, गुजरात, जम्मू काशमीर 1, कर्नाटक 14, केरळा 20, महाराष्ट्र 14, उडिसा 6, उत्तर प्रदेस 10, प. बंगाल 10, दादरा 1, दमन दीव 1
चौथा टप्पा (29 एप्रिल) – बिहार 5, जम्मू काशमीर 1, झारखंड 3, मध्य प्रदेश6, महाराष्ट्र 17, उडिसा 6, राजस्थान 13, उत्तर प्रदेश 13, प बंगाल 8