सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. अस्वस्थता आहे. (india needs to big change, says supriya sule)

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची सुप्रियाताईंपुढे 'लाईव्ह' तक्रार
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:20 AM

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. अस्वस्थता आहे, असं सांगतानाच आता देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. (india needs to big change, says supriya sule)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं. नेतृत्व हे पुरोगामी विचाराचे व समाजात तेढ आणि कटुता न ठेवता करणारे हवे. त्यासाठी देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा. जनतेला मोकळा श्वास घेण्यास संधी मिळायला हवी मात्र आज देशात दडपशाही सुरू आहे, असं स्पष्ट व परखड मत सुळे यांनी व्यक्त केलं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 60 वर्षांमध्ये कोणतीही अस्वस्थता दिसली नाही. मात्र मागील पाच-सात वर्षात ही अस्वस्थता पहायला मिळत आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राने देशाला खूप काही दिलं

15 ऑगस्टला आपला देश 75 वर्षाचा होतोय. यामध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने पाहिले गेले आहे. राज्याने पाच गोष्टींमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्रात उत्तम शिक्षण सुरू झाले. रयत शिक्षण, अंजूमन इस्लाम या संस्था तयार झाल्या. आईवडिलांना सुरक्षित वाटणारे शिक्षण संस्था आपण तयार केल्या. आरोग्य हा दुसरा मुद्दा असून त्यामध्ये पोलिओ, देवी, कुष्ठरोग अशा अनेक रोगांवर आपण मात केली आहे. तिसरा मुद्दयामध्ये चांगल्या संस्था बांधल्या गेल्या. ज्यातून विचारांची देवाणघेवाण झाली. हे केवळ राज्यापूरते सीमित नाही. तर देशपातळीवर याची दखल घेतली आहे. चौथा मुद्दा नरेगा. ही स्किम राज्याने केंद्राला दिली. स्वच्छ भारत योजना, रोजगार हमी योजना या महाराष्ट्राने तयार केल्या आणि केंद्राला दिल्या. आपल्या राज्याचे साहित्य हे फार मोठे आहे. राज्यातील साहित्य इतर राज्यांनी घेतले आहे, असे त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या आणि लिंगभेद मोठा मुद्दा

यासोबतच अपयश असलेल्या बाजूही आहेत. यातील सर्वप्रथम मुद्दा हा लोकसंख्या आहे. लोकसंख्येवर आपण नियंत्रण करू शकलो नाही. त्यासोबतच पर्यावरण, अर्बन प्लॅनिंग, स्वच्छता या गोष्टींवर जे काम करायला हवे ते आपण अजूनही केलेले नाही. लिगंभेद हा अजून एक मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. यासाठी एक राज्यच नाही तर देश म्हणूनही आपण अपयशी ठरलो आहोत, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

हिंदी, इंग्रजीचंही शिक्षण द्यावं

देशातील लोकांवर प्रचंड विश्वास आहे. वर्तमान युवा पिढीत कोणताही मतभेद उरलेला दिसत नाही. त्यावर बोलताना ग्रामीण आणि शहरी भागात हा मतभेद याआधी दिसून येत होता. मात्र आता हा मतभेद दिसत नाही. सध्या सेमी इंग्रजी ही कल्पना सर्वत्र पहायला मिळते मात्र याचे दुष्परिणामही आहेत. खरंतर कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपल्या देशात हिंदी, स्थानिक भाषा, व इंग्रजी भाषेचे शिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितलं.

देशात आणीबाणी सारखी स्थिती

मागील राजकीय पिढीचा विचार केला तर अधिवेशनात येणारी विधेयक चर्चेतून किंवा विरोधकांची मत घेवून पास केली जायची. आता मात्र विधेयकावर चर्चा करणे ही चुकीची गोष्ट वाटत असावी. यावेळच्या पावसाळी अधिवेशनात केवळ एका विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. राजकारण म्हटलं की वैचारिक मतभेद आलेच, मात्र यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिवकणीतून आपली राजकीय नाती कशी जपावी ही गोष्ट महाराष्ट्राने अजूनही पाळली आहे. आणीबाणी हा काळ आपल्या कोणालाच आवडणारा नव्हता. तशीच परिस्थिती आज देशात पहायला मिळत आहे. केंद्रातील संस्थेचा गैरवापर होतोय, मीडियावर वचक ठेवला जातोय. या सगळ्या गोष्टी मला आपण कपड्याने लिब्रल झालो पण विचाराने लिब्रल झालेलो नाही हे दाखवत आहेत, असं त्या म्हणाल्या.

पर्यावरण हा गंभीर विषय

पर्यावरण हा विषय अतिशय गंभीर आहे. यासाठी खरंतर देशातले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. कचरा, पाण्याचे नियोजन, प्लास्टिक अशा अनेक गोष्टीतून पर्यावरणाची हानी होत आहे. याचे सुनियोजन करणे जरुरी आहे. भारतीय नागरिक आपले घर अतिशय स्वच्छ ठेवतील मात्र घराबाहेर गेल्यावर पर्यावरण स्वच्छ ठेवणे कोणालाही जमत नाही. पर्यावरण हे खातं फार हलके आहे असा सगळ्यांचा समज आहे. मात्र सद्यस्थितीला पर्यावरण या खात्याकडे मोठी जबाबदारी आहे. यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने शहर व ग्रामीण भागाचे योग्य नियोजन करायला हवे, असं त्यांनी सांगितलं. (india needs to big change, says supriya sule)

संबंधित बातम्या:

वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे; जयंत पाटलांचा कवितेतून भाजपवर हल्लाबोल

धनंजय मुंडे म्हणाले होते, आमच्या बहिणीने तर चिक्कीचे पैसे खाल्ले, आता हायकोर्ट म्हणतं अजून FIR का नाही?

भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार

(india needs to big change, says supriya sule)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.