Lal Bahadur Shastri | मोदींच्या 12 कोटीच्या कारची चर्चाय, तेव्हा 12,000/-ची कार घेताना शास्त्रींनी लोन काढलेलं
सरकारकडून लाल बहादूर शास्त्री यांनी एक कार देण्यात आली होती. पण एकदा त्यांच्या मुलानं ही गाडी आपल्या खासगी कामासाठी वाररली. ही गोष्ट जेव्हा बहादूर शास्त्री यांना कळली तेव्हा त्यांनी खासगी कामासाठी जेव्हापण गाडी वापरली जाईल, तेव्हा तेव्हा त्याचे पैसे ड्रायव्हरला घ्यायला सांगितले.
अनेकदा आपल्याला कोणत्याही क्षेत्रातली पहिली व्यक्ती कोणंय हे लक्षात राहतं. दुसरं कोण आहे, हे जग लक्षात ठेवत नाही. पण लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत तसं झालं नाही. ते या प्रमेयाला अपवाद ठरले. देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून ते आजही प्रत्येक भारतीयाला लक्षात आहेतच. त्यांची पुण्यतिथी 11 जानेवारी रोजी असते. देशभरातून त्यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त असंख्यजण नमन करतील. लाल बहादूर शास्त्री यांचं देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातही मोलाचं योगदान होतं. 1921चं असकार आंदोलन, दांडी मार्च आणि 1942चं भारत छोडो आंदोलन यामध्ये त्यांची मोलाची भूमिका बजावली होती.
लाल बहादूर शास्त्री यांच्याबाबतचे यादगार आणि कधीच विसरता येणार नाही असे किस्से जाणून घेऊयात…
लाल बहादूर शास्त्रींच्या वडिलांचं त्यांच्या बालपणीच निधन झालं होतं. मिर्झापूरमध्ये लाल बहादूर शास्त्रींचं प्राथमिक शिक्षण झालं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. नदीत पोहून लाल बहादूर शास्त्री शाळेत जात असत, असं सांगितलं जातं. दररोज आणि नियमित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ते एक होते.
जाती व्यवस्थेतील विषमेचा लाल बहादूर शास्त्री यांना प्रचंड राग होता. याच विचारातून त्यांनी बाराव्या वर्षी आपलं आडनाव लावणं सोडून दिलं होतं. काशी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शास्त्री ही उपाधी त्यांनी देण्यात आली.
1951 साली लाल बहादूर शास्त्री दिल्लीत आले. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. परिवहन, संचार, उद्योग आणि गृह खातंही त्यांनी सक्षमपणे पाहिलं होतं.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री पोलीस आणि परिवहन मंत्री बनले. त्यांनी पहिल्यांदा देशात महिला कंडक्टरची नेमणूक केली होती. शिवाय जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जऐवजी पाण्याची फवारे मारले जावेत, ही कल्पनाही त्यांचीच होती.
1956 साली तामिळनाडूत झालेल्या एका भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या रेल्वे दुर्घटनेत तब्बल दीडशे लोकांचा मृत्यू झाला होता. श्वेत क्रांती आणि हरीत क्रांतीचे शिल्पकार म्हणूनही लाल बहादूर शास्त्रींकडे पाहिलं जातं.
प्रधानमंत्री झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी अत्यंत संघर्षपूर्ण संवेदनशील गोष्ट अनुभवली. 1965 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं. या काळात त्यांनी देशाचं नेतृत्त्व केलं. अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीत त्यांनी देशाचं कणखरपणे नेतृत्त्व केलं. यावेळी देण्यात आलेली महत्त्वाची घोषणा होती.. जय जवान.. जय किसान!
सरकारकडून लाल बहादूर शास्त्री यांनी एक कार देण्यात आली होती. पण एकदा त्यांच्या मुलानं ही गाडी आपल्या खासगी कामासाठी वाररली. ही गोष्ट जेव्हा बहादूर शास्त्री यांना कळली तेव्हा त्यांनी खासगी कामासाठी जेव्हापण गाडी वापरली जाईल, तेव्हा तेव्हा त्याचे पैसे ड्रायव्हरला घ्यायला सांगितले.
लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबीयांनी त्यांनी एक गाडी घेण्यासाठी आग्रह केला होता. तेव्हा त्यांनी एक फियाट कार खरेदी केली होती. तेव्हाच्या काळी बारा हजार रुपयांची असलेली ही कार घेण्यासाठी पाच रुपये लाल बहादूर शास्त्रींकडे कमी पडले. त्यांच्या फक्त सात हजार रुपये बँकेतील खात्यात होते. त्यामुळे त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून पाच हजार रुपयांचं कर्ज काढलं होतं. दिल्लीतील शास्त्री मेमोरीयलमध्ये हा यादगार किस्सा आजही ठेवण्यात आला आहे.
लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू आजही एक गूढ आहे. संशयास्पद मृत्यूबाबत अनेक दंतकंथ आजही ऐकायला मिळतात. मात्र खरं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानसोबत शांतता करारवर सह्या केल्या. त्यानंतर अवघ्या 12 तासांतच त्यांचा मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्री यांचा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. पहिला भारतरत्न पुरस्काराचे मानकरीही लाल बहादूर शास्त्रीच ठरले होते!
इतर बातम्या –
Wardha: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात; डॉक्टरसह दोघांना अटक
Supreme Court: कोरोनाच्या याचिकेआडून पब्लिसिटी स्टंट; सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला झापले
Ratan Tata | पुण्याचा शांतनु रतन टाटांचा इतका खास कसा काय झाला? त्याची गोष्ट