Video | नुसतं परदेशात उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नसतात, हायपॉवर कमिटीनं काय केलं हे महत्त्वाचं, उद्योगमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

| Updated on: Sep 15, 2022 | 11:01 AM

15 जुलैला शिंदे सरकार आल्यानंतर यासाठीची हायपॉवर कमिटी स्थापन झाली. 38 हजार 831 कोटींचं इंसेंटिव्ह पॅकेज मंजूर केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य उदय सामंत यांनी टीव्ही 9 शी बोलताना केलं.

मुंबईः महाविकास आघाडीचे नेते वेदांता प्रकल्पाचं खापर शिंदे सरकार फोडत असलं तरीही विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) ही संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे. नुसतं परदेशात उद्योजकांना भेटून आपल्या राज्यात प्रकल्प येत नसतात, तर त्यासाठी उद्योगांना आपण सरकारतर्फे काय देतो, यासाठी हायपॉवर समितीची स्थापना करावी लागते, असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलंय. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxcon) प्रकल्प गुजरातला जाण्यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. जनतेला आता दुसऱ्या प्रकल्पाचं गाजर दाखवू नका, वेदांताच इथे आणा, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. त्याला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मविआ सरकारने 7  महिन्यांत या प्रकल्पासाठी काहीही केलं नाही. 15 जुलैला शिंदे सरकार आल्यानंतर यासाठीची हायपॉवर कमिटी स्थापन झाली. 38 हजार 831 कोटींचं इंसेंटिव्ह पॅकेज मंजूर केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासाठी प्रयत्न करत आहेत. कालच वेदांता ग्रुपचे मालक अग्रवाल यांनी केलेलं ट्विट याच प्रयत्नांना आलेलं यश आहे. वेदांता प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.’

Published on: Sep 15, 2022 11:01 AM