Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची केंद्राशी चर्चा, राज्याच्या चार दिवसांच्या घडामोडींवर बोलणं झाल्याची माहिती

राणा प्रकरण, किरीट सोमय्या, मोहित कंबोज हल्ला प्रकरणाची माहिती घेतली. महाविकास आघाडी सरकार विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे केंद्रीय भाजपचे आदेश असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची केंद्राशी चर्चा, राज्याच्या चार दिवसांच्या घडामोडींवर बोलणं झाल्याची माहिती
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:17 AM

मुंबई : मुंबई : भाजपाच्या दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. राज्यात घडलेल्या सर्व घटनांची माहिती घेतली. मागील चार दिवसांत घडलेल्या घडामोडींची माहिती घेतली. गृहमंत्री अमित शाहा (Home Minister Amit Shah), भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. राणा प्रकरण, किरीट सोमय्या, मोहित कंबोज हल्ला प्रकरणाची माहिती घेतली. महाविकास आघाडी सरकार विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे केंद्रीय भाजपचे आदेश असल्याची माहिती आहे.

राज्यातील कायदा, सुव्यवस्थेवर चर्चा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्यात. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सोमय्या यांच्यावरही हल्ला करण्यात आला. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत. नारायण राणेंसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेनेवर चांगलाच प्रहार केलाय. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली. राज्यातील कायदा, सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकले नाही. पण, शिवसेनेनं गेल्या चार दिवसांत दाखवलेली आक्रमकता प्रामुख्यानं सांगण्यात आली असावी.

राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा गुन्हा कसा?

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी मागितली होती. परंतु, शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा दिला. राणा दाम्पत्याच्या अमरावती येथील घरासमोर शिवसैनिक आक्रमक झालेत. शिवाय मुंबई येथील राणा दाम्पत्याच्या विरोधातही त्यांनी हल्लाबोल केला. पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरात घुसून उचलून नेले. हा कोणता कायदा आहे, असा आरोप आमदार, खासदार दाम्पत्यानं केला. लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे उचलून ठाकरे सरकार हुकुमशाही करत आहे, असा आरोपही करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारमधील गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळं राज्यात राष्ट्रपती राजवटीबद्दल विचार केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

MP Navneet Rana | खासदार नवनीत राणांचा बीपी वाढला? भायखळा कारागृहातील रुग्णालयात प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Heat wave : विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता

Breaking : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला- सूत्र

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.