अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; ‘त्या’ रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर

देशाच्या राजकारणात सध्या गुजरातमधील घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भाजप नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. (Vijay Rupani)

अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; 'त्या' रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर
amit shah
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 12:21 PM

अहमदाबाद: देशाच्या राजकारणात सध्या गुजरातमधील घडामोडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भाजप नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. रुपाणी यांनी राजीनामा का दिला? यावर अनेक कयासही लढवले जात आहेत. त्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये येऊन मध्यरात्री बैठक घेतल्यानंतरच रुपाणी यांनी राजीनामा दिल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे ‘त्या’ रात्री असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागला. असा प्रश्न विचारला जात आहे. (Inside story: Why Rupani had to resign as Gujarat CM, why amit shah visit gujarat?)

विजय रुपाणी हे अमित शहा यांचे खास समजले जातात. शनिवारी दुपारी रुपाणी हे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटायला गेले. तेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी रुपाणी राज्यपालांना भेटायला गेले असावेत असा कयास वर्तवला जात होता. राज्यपालांना भेटल्यानंतर रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत सर्वच अनभिज्ञ होते. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती देतील, असं वाटत होतं. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळेच रुपाणी यांच्या अचानक राजीनाम्यावरून तर्कवितर्क लढवले गेले.

रात्री आले, सकाळी गेले

ही चर्चा सुरू असतानाच अमित शहा शुक्रवारी रात्री गुजरातमध्ये आल्याचंही समोर आलं. शहा शुक्रवारी रात्री अचानक गुजरातमध्ये आले आणि पहाटे निघून गेल्याचं समोर आल्याने पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आलं.

काही तासांच्या बैठकीनंतर राजीनाम्याचा निर्णय

रुपाणी यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवरच शहा यांनी गुजरातचा धावता दौरा केल्याचं सांगितलं जातं. शहा शुक्रवारी रात्री अचानक गुजरातला आले. त्यांनी मध्यरात्री राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. काही तास ही बैठक चालली. त्यानंतर रुपाणी यांनी राजीनामा देण्याचं ठरलं. त्यानंतर शहा पहाटेच दिल्लीला निघून गेले. रुपाणी राजीनामा देणार असल्याची खबर गुप्त ठेवण्यात आली. दुपारी रुपाणी राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राजीनामा दिला. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केवल रुपाणी यांनी राजीनामा देण्याचंच ठरलं नाही तर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचाही निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

रुपाणींना का हटवलं?

रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. त्यापैकी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात आलेलं अपयश हे प्रमुख कारण असलेलं सांगितलं जात आहे. तसेच गुजरातमध्ये विरोधी पक्षांचा जनाधार वाढला आहे. उद्या गुजरातमध्ये पानीपत झालं तर त्याचा देशभर मेसेज जाऊन मोदी आणि भाजपच्या लोकप्रियतेला आहोटी लागेल या भीतीनेच रुपाणी यांना हटवण्यात आल्याचं सांगितलं जातं. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणांसाठीही रुपाणी यांना पायउतार व्हावं लागल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

संघाच्या सर्व्हेचा फटका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नुकताच एक सर्व्हे केला होता. गुजरातच्या रुपाणी सरकारशी संबंधित हा सर्व्हे होता. रुपाणींच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्यास भाजपचं जिंकणं कठिण असल्याचं या सर्व्हेत म्हटलं होतं. त्याचाही फटका रुपाणी यांना बसल्याचं सांगितलं जातं.

सर्व्हे काय सांगतो?

काँग्रेस नेते हार्दीक पटेल यांनी ट्विट करून संघाच्या सर्व्हेची आकडेवारी जाहीर केली होती. ऑगस्टमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसला गुजरात विधानसभा निवडणुकीत 43 टक्के मते मिळणार असून काँग्रेस 96-100 जागा जिंकणार असल्याचं म्हटलं होतं. तर भाजपला केवळ 38 टक्के मते मिळणार असून भाजपला 80-84 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचं म्हटलं होतं. या शिवाय आपला 3 टक्के, एमआयएमला एक टक्के तर अपक्षांना 15 टक्के मते मिळणार असल्याचं या सर्व्हेत स्पष्ट करण्यात आल्याचं पटेल यांनी म्हटलं होतं. (Inside story: Why Rupani had to resign as Gujarat CM, why amit shah visit gujarat?)

संबंधित बातम्या:

आधी उत्तराखंड आणि नंतर कर्नाटक, आता गुजरात, भाजपात मुख्यमंत्री बदलाची मालिका; नेमकं कारण काय काय? वाचा सविस्तर

Gujarat CM Resigns: गुजरातच्या राजकारणात भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

गुजरातला आज नवा मुख्यमंत्री मिळणार, 3 नावं चर्चेत, भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत?

(Inside story: Why Rupani had to resign as Gujarat CM, why amit shah visit gujarat?)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.