जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी

स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न लावण्यात आल्याने प्रचंड चर्चा रंगली आहे. | Eknath Khadse

जयंत पाटलांच्या स्वागताच्या बॅनर्सवरुन नाथाभाऊ गायब; खडसेंच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची गटबाजी
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 10:24 PM

जळगाव: भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते.

मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर सोपविली आहे. अशावेळी स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न लावण्यात आल्याने प्रचंड चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील गटबाजीतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. आता शुक्रवारी जयंत पाटील जळगावात आल्यानंतर नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेले 107 बॅनर्स उतरवले

जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एकनाथ खडसेंचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवले: जयंत पाटील

एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. ते गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसे साहेबांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की काय अशी शंका उत्पन्न होत असल्याची टिप्पणी जयंत पाटील यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

..तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही- खडसे

खडसेंची राष्ट्रवादीत एन्ट्री झाल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर, अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपला रोखण्याची रणनिती!

शरद पवार यांनी पक्षात घेतलं नसतं, तर मी राजकारणातून बाद झालो असतो – एकनाथ खडसे

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.