खोटं बोलून दिशाभूल, नितीन राऊतांच्या विधानाची चौकशी करा, नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जाणूनबुजून ऊर्जामंत्री नितीन राऊत या मुलांना आपण भरती करून घेऊ अशी विधानं माध्यमांमधून केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाची चौकशी व्हावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
मुंबई : खोटं बोलून मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली आहे. सध्या पदवीधर आमदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपण मराठा समाजातील तरुणांसाठी काहीतरी चांगलं केलं असं दाखवण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी खोटी विधानं केल्याची टीका यावेळी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. (Investigate Nitin Rauts false statement Narendra Patils demand to the Chief Minister)
सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे ऊर्जा विभागातील जागा एसइबीसी प्रवर्गातील तरुणांना बाजूला ठेऊन भरल्या जातील असं पत्रकाव्दारे महावितरण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक असीम गुप्ता यांनी स्पष्ट केलं. पण तरीदेखील जाणूनबुजून ऊर्जामंत्री नितीन राऊत या मुलांना आपण भरती करून घेऊ अशी विधानं माध्यमांमधून केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाची चौकशी व्हावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रश्नी लक्ष घालून मराठा समाजातील मुलांमध्ये सुरू असलेला संभ्रम दूर करावा असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नरेंद्र पाटील हे सध्या कोरोनाबाधित झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेतं आहेत. पण मराठा समाजासाठी त्यांनी रुग्णालयातून ही मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. (Investigate Nitin Rauts false statement Narendra Patils demand to the Chief Minister)
दरम्यान, महावितरणमधील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदाकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहुन सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC)वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. x
या भरती प्रक्रियेवरुन मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाकडून एक प्रसिद्धिपत्रक काढण्यात आलं आहे. त्यात राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. “महाराष्ट्र सरकारने दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाला संक्रांत भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाने वारंवार सांगितले आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षण विषय संपत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये.
मराठा आरक्षण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार बाजूला ठेवून इतरांना नियुक्ती देत आहे. शुभ मुहूर्त हा दिवाळी घेतला कारण सण असल्याने आंदोलन होणार नाही. बाकी सर्व मराठे सूज्ञ आहेत”. अशा शब्दात महावितरणच्या भरती प्रक्रियेला विरोध दर्शनवण्यात आला आहे.
इतर बातम्या –
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या; राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची मागणी
VIDEO | Nirin Raut | नागरिकांना आलेली वीजबिलं त्यांना भरावीच लागणार – नितीन राऊतhttps://t.co/DPDqiNhH2w@NitinRaut_INC #electricity #electricitybill
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(Investigate Nitin Rauts false statement Narendra Patils demand to the Chief Minister)