Special Report : अजित पवार नॉट रिचेबल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय घडतंय?
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्विट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिरापासून अजित पवार नॉट रिचेबल आहेत.