Ekanth Shinde | शाहंनी महाराष्ट्रात येऊन बाजी मारली का? शिंदेंच्या शिवसेनेला इतक्याच जागा मिळणार का?
Ekanth Shinde-Amit Shah Meeting | लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नमत घ्याव लागणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रात्रीपासून जागा वाटपाबाबत खलबत सुरु आहेत. पण अजून ठोस तोडगा निघू शकलेला नाही. शिंदे गटाची मागणी किती जागांची आहे? आणि भाजपा किती जागा द्यायला तयार आहे?
Ekanth Shinde-Amit Shah Meeting (विनायक डावरुंग) | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्रा दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप निश्चित करण हा सुद्धा अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामागचा उद्देश आहे. महायुतीमध्ये एकूण तीन पक्ष आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पण महाराष्ट्रातील उमेदवार या यादीमध्ये नाहीयत. कारण तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप निश्चित झालेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एक गट सत्तेत तर एक गट विरोधी पक्षात आहे. जे गट भाजपासोबत आहेत, त्यांना राज्याच्या राजकारणातील स्वत:ची स्पेस कमी करायची नाहीय. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा तिढा सहजासहजी सुटू शकत नाही.
संभाजीनगर येथे काल सभा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत जागा वाटपाबाबर चर्चा केली. आज सकाळी सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपाबाबत अमित शाह यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. ताज्या माहितीनुसार, भाजपा शिवसेनेला 13 जागा द्यायला तयार आहे. एकनाथ शिंदे यांनी 18 जागांची मागणी आहे. शिंदे गटाला हव्या असणाऱ्या उर्वरित पाच जागांचा निर्णय सर्वेनुसार होऊ शकतो. आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली.
अमित शाह काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत?
जिंकलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्यायला भाजपा तयार असल्याची माहिती आहे. अमित शाह हे शिंदेंना विविध मतदारसंघातील ग्राउंड रिॲलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, तिथे भाजपा जिंकू शकते, असा अमित शाह यांचा सूर आहे. फक्त एकनाथ शिंदे किती जागांवर राजी होतात हे महत्त्वाच आहे. निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी एकनाथ शिंदेंची मागणी आहे.