Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले राजू पाटील यांना त्यांच्या गावातून एकही मत मिळालं नाही, पण वास्तवात सत्य वेगळच

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभेत बोलताना माजी आमदार राजू पाटील यांच्या गावाच उदहारण दिलं होतं. राजू पाटील यांच्या गावची लोकसंख्या 1400 आहे, तिथून त्यांना एकही मत मिळालं नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती या उलट आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले राजू पाटील यांना त्यांच्या गावातून एकही मत मिळालं नाही, पण वास्तवात सत्य वेगळच
Raj Thackeray-Raju Patil
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 8:00 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल वरळी येथे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे प्रथमच बोलले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. याआधी 2009 साली पहिल्या विधानसभा निवडणुकीत एकाचवेळी मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. पण 2024 मध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. मनसेच मतदान मोठ्या प्रमाणात घटलं.

या विधानसभा निवडणूक निकालाच विश्लेषण करताना पक्षाची पिछेहाट झाली, हे राज ठाकरे यांना मान्य नाहीय. “लोकांनी आपल्याला मतदान केलं, पण ते मतदान आपल्यापर्यंत आलचं नाही” असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. अप्रत्यक्षपणे ते अन्य पक्षांप्रमाणे पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार ठरवत आहेत. EVM मध्ये काहीतरी गडबड आहे, असं त्यांना सुचवायच आहे. मनसेच्या पराभवाच विश्लेषण करताना त्यांनी काही उद्हारण दिली. त्याचा पाठपुरावा केला असता, राज ठाकरे यांच्या दाव्यात तथ्य आढळून आलं नाही.

राजू पाटील यांच्या गावाबद्दल राज ठाकरेंच विधान काय?

“राजू पाटील यांचं एक गाव आहे, पाटलांच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होतं. 1400 लोकं त्या गावात राहतात. त्यांना किती मत मिळाली. अख्ख्या गावाच मतदान त्यांना होतं. त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळाल नाही. अख्ख्या गावातून एक मत नाही पडलं, जी 1400 मतं राजू पाटील यांना मिळायची, तिथे एक मत मिळत नाही” असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांचा चुकीची माहिती कोणी दिली?

राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर टीव्ही 9 मराठीची टीम कल्याण ग्रामीणचे मनसे उमेदवार व माजी आमदार राजू पाटील यांच्या काटई गावात पोहोचली. गावात एकूण 1,470 मतदार आहेत. तीन मतदान केंद्रावर राजू पाटील यांना गावातून 683 मते मिळाली. गावातील मतदान यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. काल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांच्या गावच उदहारण दिलं होतं. ‘राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी दिली?’ असा गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सवाल

राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?.
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला.
"निर्लज्ज, विश्वासघातकी", गोऱ्हेंच्या आरोपांवरून ठाकरेंची सेना भडकली
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर.
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?.
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या.
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका.