Sanjay Raut : शिवसेना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याच्या तयारीत?; राऊत बोलता बोलता काय बोलले?

| Updated on: Jun 21, 2022 | 10:15 PM

Sanjay Raut : तुम्ही आकडे कसले मोजताय? विधानसभेत वेळ येईल तेव्हा तुम्ही आकडे मोजा. त्यावेळी आमचं पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे आमदार आमच्यासोबत येणार नाही. ज्यांनी नियमांचं पालन केलं नाही, त्यांची आमदारकी रद्द होईल.

Sanjay Raut : शिवसेना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याच्या तयारीत?; राऊत बोलता बोलता काय बोलले?
शिवसेना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याच्या तयारीत?
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात कोणताही राजकीय भूकंप झालेला नाही. जे आमदार सुरतला आहेत. त्यांनी परत यावं. नाही आले तर विधानसभेत शक्तीप्रदर्शन करण्याची वेळ आली तर आम्ही शक्तीप्रदर्शन करून बहुमत सिद्ध करू, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक झाली. या बैठकीनंतर राऊत यांनी थेट विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची भाषा केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्यासोबतच्या बैठकीत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या एकदोन दिवसात त्याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

तुम्ही आकडे कसले मोजताय? विधानसभेत वेळ येईल तेव्हा तुम्ही आकडे मोजा. त्यावेळी आमचं पूर्ण बहुमत सिद्ध होईल. जे आमदार आमच्यासोबत येणार नाही. ज्यांनी नियमांचं पालन केलं नाही, त्यांची आमदारकी रद्द होईल. त्यांना निवडणुकीला सामोरे जावं लागेल. त्यामुळे या आमदारांचं राजकीय करिअर संपेल. एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहे. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. शिंदे त्यांच्यासोबतच्या आमदारांसह परत येतील अशी खात्री आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

भाजपचे गुंड संरक्षण करताहेत

आमदारांना परत मुंबईत यायचं आहे. त्यांना येऊ दिलं जात नाही. काही आमदार रुग्णालयात आहे. ही गंभीर बाब आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी यात तात्काळ यात लक्ष घालावं. आपण न्यायप्रिय गृहमंत्री आहेत हे त्यांनी दाखवून द्यावं, असं सांगतानाच बंडखोर आमदारांसोबत संवाद सुरू आहे. जे आमदार सुरतला आहेत, त्यांना परत येण्याची आवाहन केलं जात आहे. शिवसेनेच्या या आमदारांच्या संरक्षणासाठी मुंबईतील गुंड बसले आहेत. ज्यांच्यावर इथे गुन्हे दाखल आहेत, अशा भाजपच्या लोकांकडून संरक्षण करण्याची वेळ यावी हे दुर्देव आहे, असंही ते म्हणाले.

शिंदेंचा बहाणा आहे

पक्षाचं धोरण पक्ष ठरवतोय. ते भाजपबरोबर होते तेव्हा त्यांच्याकडे कोणती खाती होती? आज महाविकास आघाडीसोबत आहेत तेव्हा त्यांची किती प्रतिष्ठा वाढली ते पाहावं. हा बहाणा आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रेमाने यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही ते म्हणाले.