Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : शिवसेना-भाजप सोबत येणं भल्याचं, पण मी ठाकरेंसोबतचं, भावना गवळींच्या सुरात प्रतापराव जाधवांचाही सूर

प्रतापराव जाधव म्हणाले, दोन्ही आमदारांशी संपर्क झाल्यानंतर कळेल की, नेमकं काय झालं. जिल्ह्यातील दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचं मी टीव्हीवरून ऐकलं. मी त्यांना फोन केला. पण, फोन बंद होते. त्यामुळं ते कुठं गेले हे मी सांगू शकत नाहीत. मी उद्धव ठाकरे यांना माननारा आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना-भाजप सोबत येणं भल्याचं, पण मी ठाकरेंसोबतचं, भावना गवळींच्या सुरात प्रतापराव जाधवांचाही सूर
खासदार प्रतापराव जाधव
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:42 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचे जिल्ह्यातील दोन्ही शिवसेनेचे आमदार समर्थक समजले जातात. दोन्ही शिवसेनेचे आमदार जाधव यांना सांगितल्याशिवाय फारसं काही करत नाहीत. परंतु, हे दोन्ही आमदार माझ्या संपर्कात नाहीत, असं स्पष्टीकरण खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. प्रतापराव जाधव म्हणाले, माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जातोय. मी उद्धव ठाकरेंचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. कोणीही खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात नाहीत. शिवसेना – भाजप सोबत येणं दोन्ही पक्षासाठी भल्याचं आहे. हिंदुत्व (Hindutva) हा आत्मा आहे. दोन्ही पक्ष वेगळे राहिले तर शिवसेनेचे नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी एकत्र आल्यास सगळ्यांचा फायदा होईल. हिंदुत्वाचं विभाजन (division) झालं तर सेना – भाजपचं नुकसान होईल. दरम्यान, काल खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. या पत्रात एकनाथ शिंदे यांच्या गटाचं म्हणणं आपण समजून घ्यावं, मागणी मान्य करावी, असं म्हटलं होतं. एकंदरित विदर्भातील शिवसेना खासदारांचा हाच सूर असल्याचं यातून दिसून येतं.

शिवसेना सोडणार नाही

भाजपच्या मदतीने लोकसभेत निवडून आलो. माझ्या मतदारसंघातील दोन आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले हे मला माहिती नव्हतं. मी ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार आहे. शिवसेनेत दोन गट नाहीत. गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सेना आमदारांना चुकीची वागणूक दिली गेली. शिवसेना आमदारांना निधी दिला गेला नाही. सापत्न वागणूक मिळाली, हे खरं आहे. उद्धव ठाकरे इनोसन्ट आहेत. पण एनसीपी नेते डावपेच खेळणारे आहेत. मी कुठेही जाणार नाही. मी शिवसेनेतच राहणार, असंही प्रतापराव जाधवांनी स्पष्ट केलं.

भाजपासोबत जायला हवे

काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर काही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. पण, नेमके कोण कोणासोबत आहेत. यावरून संभ्रम आहे. काही खासदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असल्याचं बोललं जातं. बंडखोरांची मागणी मान्य करावी, असं पत्र काल यवतमाळच्या भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलंय. याचा अर्थ भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, असं गवळी यांनाही वाटतं. हाच मुद्दा प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

गैरसमज पसरवला जातोय

प्रतापराव जाधव म्हणाले, दोन्ही आमदारांशी संपर्क झाल्यानंतर कळेल की, नेमकं काय झालं. जिल्ह्यातील दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचं मी टीव्हीवरून ऐकलं. मी त्यांना फोन केला. पण, फोन बंद होते. त्यामुळं ते कुठं गेले हे मी सांगू शकत नाहीत. मी उद्धव ठाकरे यांना माननारा आहे. त्यामुळं मी मात्र ठाकरेंसोबत राहणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यासंदर्भात काही लोकं हे गैरसमज पसरविला जातो. हे योग्य नाही, असंही जाधव म्हणाले.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.