घरात बसून फेसबुकवर लाईव्ह करून चालत नाही फेस टू फेस जावे लागते, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे सध्या राज्यभरात सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला लक्ष्य करत आहेत. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कडकनाथ होऊन चालत नाही, घरात बसून फेसबूक लाईव्ह करुन होत नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

घरात बसून फेसबुकवर लाईव्ह करून चालत नाही फेस टू फेस जावे लागते, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 4:11 PM

मुंबई | 15 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जी कामं आधी झाले नाहीत ती 10 वर्षात मोदी गॅरंटीमध्ये झाली. म्हणून सर्व मोदी गॅरंटी बोलत आहेत. संवेदनशील सरकार असलं पाहिजे. घरात बसून फेसबुकवर लाईव्ह करून चालत नाही. फेस टू फेस जावे लागतेय. आरोपाला एकनाथ शिंदे आरोपांनी उत्तर देत नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे.

महिलांना पायावर उभे करणे काळाची गरज

  • माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही. सर्व माझं कुटुंब आहे. मच्छिमारांची मागणी जी आहे. ती पूर्ण करण्याचे आयुक्तांना आदेश दिले आहेत. आज जे उघाटन होत आहे यात महिलांच्या खात्यात डायरेक पैसे जमा होणार आहे. महिला कुटुंबाचा आधार असते त्यांना त्याच्या पायावर उभे करणे काळाची गरज आहे. महिला वॉर्ड मध्ये पुरुष उभा राहू शकत नाही.”
  • पायलटपासून अगदी युद्ध पाणबुडीपर्यंत सगळीकडे महिला आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर देखील आपल्या महिला भगिनी आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आदिवासी महिलेला एकाएवढ्या सर्वोच्च पदावर संधी देण्याचा बहुमान आपल्या देशाला मिळालेला आहे आणि म्हणून नारीशक्ती कुठेही मागे नाहीये.
  • मोदींनी महिला आरक्षणाचा निर्णय घेतला. आपण कुटुंब सांभाळता पुरुष बांधव आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात अशा प्रकारच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात.
  • महिलांना प्रत्येकी 1 लाख देणारी ही पहिली महापालिका आहे. महिला सुरक्षेसाठी नियोजन करण्याचा सूचना दिल्या. महिलांना काही त्रास झाला तर लगेच मदत मिळते. पोलिसांची मदत घेऊन महिला सुरक्षा अभियान हे आपण सुरू केले.
  • कुठली महिला कुठेही तिला अडचण आली काय बनवायचं ते सगळं एक तज्ञ माणसं घ्या त्याच्यामध्ये आणि कुठेही अडचणीत असलेली महिला भगिनी असेल तिला तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारचा देखील सूचना मी केलेले आहेत.
  • 60 लाख महिला जोडलेल्या आहेत. ते 2 कोटी पर्यंत गेले पाहिजे. आधीच्या सरकारने अहंकार पाहून सर्व बंद केलं होतं. राज्याने अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. मी मुख्यमंत्री आहे मात्र स्वतःला कडक सिंघ बनल्यावर कोण भेटेल. यामुळे अंतर वाढले जाते अशी टीका देखील त्यांनी ठाकरेंवर केली आहे.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.