Ramdas Kadam : जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, रामदास कदमांचा भाजपवर पहिला बॉम्ब
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यासी मी सहमत नाही. अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
मुंबई : शिवसेना संपली आहे. अशी टिपण्णी जेपी नड्डा यांनी केली. त्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली. प्रादेशिक पक्ष संपविण्याचा भाजपचा (BJP) कटकारस्थान आहे. जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या नियंत्रणाखालील शिवसेना संपत चालली, असा खुलासा जेपी नड्डा यांनी केला असेल. त्याच्याशी मी सहमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच काम सुरू आहे. त्यामुळं शिवसेना संपायचा प्रश्न येत नाही. संभाजीनगरला हजारो लोकं काल शिवसेनेच्या कार्यक्रमात आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) काळात जशी लोकं एकत्र यायची, तसं चित्र काल संभाजीनगरात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात पाहायला मिळाला. त्यामुळं बाळासाहेबांची शिवसेना अजून संपलेली नाही, असं रामदास कदम म्हणाले.
गुलाम कोण कोणाचं होतं
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यासी मी सहमत नाही. अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. जे सर्व लोक गेली आहेत ते गुलाम आहेत का? असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला. गुलाम कोण कोणाचं होतं हे बघा. संजय राऊतांनी कधीही राष्ट्रवादीने 57 टक्के निधी नेला. त्यावर राऊतांनी कधी मुलाखत दिली का. तुम्ही गुलाम राष्ट्रवादीचे आहात का हा विचार केला पाहिजे. आधी संजय राऊतांना नोटीस आले. तेव्हा पवार मोदींना भेटले, कोण कुणाच्या मांडीवर बसलंय हेही महाराष्ट्राने बघीतलं आहे, असा घणाघात रामदास कदम यांनी केलाय.
नारायण राणे, नवनीत राणांनाही अटक झालीच ना?
संजय राऊतांनी असं बोलणं शोभत नाही. अनेक लोकांना आधी अटक झाली आहे. नारायण राणे आणि नवनीत राणा यांना अटक झालीच ना. संजय राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत. ते लढाई जिंकून येतील, असा विश्वास वाटतो त्यांना, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला. हे कायद्याचं राज्य आहे. संविधानानुसार सर्वांना अधिकारी मिळाले आहेत. गुन्हा केला नसेल, तर काहीही होणार नाही. न्याय नक्की मिळेल, असंही कदम म्हणाले.