Bihar Politics | ‘जर विभीषण रामाच्या शरणात येऊ शकतो, तर…’ सत्ता बदलानंतर काय म्हणाले जगद्गुरु रामभद्राचार्य?

Bihar Politics | मागच्या तीन दिवसात बिहारच राजकारण बदलून गेलय. कोणी अपेक्षा केली नव्हती, असे बदल अचानक घडले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हेच यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. बिहारमध्ये जे घडलं, त्याचे दूरगामी परिणाम राष्ट्रीय राजकारणात दिसून येतील.

Bihar Politics | 'जर विभीषण रामाच्या शरणात येऊ शकतो, तर...' सत्ता बदलानंतर काय म्हणाले जगद्गुरु रामभद्राचार्य?
jagadguru rambhadracharya
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 9:48 AM

Bihar Politics | बिहारमध्ये मागच्या तीन दिवसांपासून सुरु झालेली राजकीय ड्रामेबाजी अखेर रविवारी संपली. भाजपासोबत मिळून नितीश कुमार यांनी 9 व्यां दा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेताच, आरजेडीने आक्रमक पवित्रा घेतला. या दरम्यान जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी विभीषण रामाच्या शरणात आला, त्याच उद्हारण दिलं. नितीश आरजेडीसोबत असताना त्यांना मान, सन्मान मिळत नव्हता, असं सांगितलं.

नितीश कुमार मुख्यमंत्री बनल्यानंतर जगद्गुरु रामभद्राचार्य उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये बोलत होते. “जे काही घडतय, ते चांगलं आहे. राजकारणात हे सर्व सुरुच असतं. नितीश कुमार यांना तो मान, सन्मान मिळत नव्हता. रावणाचा भाऊ विभीषण रामच्या शरणात येऊ शकतो, तर नितीश कुमार आल्याने काय फरक पडतो?” असं जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?

नितीश कुमार NDA मध्ये दाखल झाल्यानंतर आज सोमवारी कॅबिनेटची पहिली बैठक होणार आहे. नितीश कुमार यांच्या कॅबिनेटची पहिली बैठक मंत्रिमंडळ कक्षात सकाळी 11.30 वाजता होईल. बिहार विधानसभेच सत्र 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

‘जिथे आधी होतो, तिथेच आलो’

नितीश कुमार यांच्यासोबत 8 आमदारंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या सर्व विभाग नितीश कुमार यांच्याकडेच राहतील. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप होईल. 9 व्यां दा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुक्ती मिळाली, अशी नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. जिथे आधी होतो, तिथेच आलो. सोमवारी कॅबिनेटची पहिली बैठक होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

‘हे आमच्यासाठी खूप दु:खद’

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत संयोजक पदाच्या शर्यतीत नितीश कुमार आघाडीवर होते. काँग्रेससह त्यांनी अनेक पक्षांना एकत्र आणण्याच काम केलं. पण त्यांना संयोजक बनवलं नाही. ही बाब नितीश कुमार यांना खटकली. मला कुठल्याही पदाची लालसा नाही, हे अनेकदा ते बोलले होते. आता ते एनडीए सोबत आहेत. नितीश कुमार एनडीए आघाडीत गेल्यानंतर काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, ‘कॅप्टनने आघाडी सोडलीय, हे आमच्यासाठी खूप दु:खद आहे’

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.