वडील शिंदेंकडे, मुलगा उद्धव ठाकरेंकडे, नवे ठाकरे पहिल्यांदाच माध्यमांसमो, पाहा Video

शिवसेनेवर एवढं मोठं संकट आलं असताना ठाकरे कुटुंबातील सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, असं म्हटलं जातंय. यानिमित्तानं एक ठाकरे प्रथमच माध्यमांसमोर झळकलेत. तेही उद्धव ठाकरेंना पाठींबा देत....

वडील शिंदेंकडे, मुलगा उद्धव ठाकरेंकडे, नवे ठाकरे पहिल्यांदाच माध्यमांसमो, पाहा Video
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 3:24 PM

मुंबईः उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) यंदा दसरा मेळाव्यात झळकले. मात्र ते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बीकेसी मेळाव्यात दिसून आले. ठाकरे घराण्यातील असूनही जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याने खरं तर याची तुफ्फान चर्चा रंगलीय. पण आज आणखी एका ठाकरेंच्या निर्णयाने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. जयदेव ठाकरेंचेच पुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले.

वडिलांविरोधात मुलाने अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेतील विशेषतः ठाकरे घराण्यातील मतभेद आणखी अधोरेखित झालेत. जयदेव ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे थोरले बंधू आहेत. तर जयदीप ठाकरे हे जयदेव ठाकरेंचे पुत्र असून सध्या ते परस्परांसोबत राहात नाहीत. जयदीप ठाकरे हे वांद्रे येथील मोठ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहेत.

जयदीप ठाकरे यांनी टीव्ही9 शी बातचित केली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात मोठे नातू जयदीप जयदेव ठाकरे यांनी आज प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. या निमित्ताने आणखी एक ठाकरे राजकारणात सक्रीय होताना महाराष्ट्राला दिसण्याची शक्यता आहे.

जयदीप ठाकरे म्हणाले, मी या घराण्यातला सर्वात मोठा नातू आहे. मला उद्धव काका आणि आदित्यबद्दल आदर आहे. आजच्या अत्यंत विचित्र स्थितीत मी माझ्या कुटुंबाबरोबर असणं हे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो…

मात्र वडील जयदेव ठाकरे हे शिंदे गटात असल्याने बऱ्याच चर्चा रंगतायत. त्यावर जयदीप ठाकरे म्हणाले, ‘ मी क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. उद्धव ठाकरेंना वाटलं, माझ्यावर एखादी जबाबदारी टाकावी, तर ती मी स्वीकारेन. पक्षाला वाढवायला मी नक्की मदत करेन…

नवे ठाकरे प्रथमच माध्यमांसमोर.. ऐका-पाहा …

उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाच्या संपर्कात मी नेहमी असतो, असे जयदीप ठाकरे म्हणाले. शिवसेनेत जे झालंय, ते कुणालाच पटलेलं नाही. अशा वेळेला सर्वच कुटुंबियांनी एकत्र आलं पाहिजे..

पण जे तसं करत नाहीयेत, त्याचं कारण इतरांना विचारा, अशी नाराजीही अप्रत्यक्षपणे जयदेव ठाकरेंबद्दल त्यांनी व्यक्त केली.

वडीलांविरोधात भूमिकेबद्दल विचारलं असता जयदीप ठाकरे म्हणाले, मला लहानपणापासून आईने वाढवलं आहे. त्यांच्याशी माझा फारसा संपर्क नाहीये. त्यामुळे आईच्या ओरडण्याला मी जास्त घाबरतो…

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.