माझ्या कुटुंबात 9 जण, मग मला 5 मतं कशी? उमेदवार ढसाढसा रडला!
जालिंधर (पंजाब) : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपप्रणित एनडीएला 300 हून जागा मिळाल्या. निर्विवाद बहुमत मिळवत एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र निकालावेळी आणि नंतरही अनेक रंजक गोष्टी घडल्या. पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून अशीच काहीशी रंजक गोष्ट समोर आली. झालं असं की, नितू शुत्तर्ण वाला हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढले. या मतदारसंघात […]
जालिंधर (पंजाब) : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपप्रणित एनडीएला 300 हून जागा मिळाल्या. निर्विवाद बहुमत मिळवत एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र निकालावेळी आणि नंतरही अनेक रंजक गोष्टी घडल्या. पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातून अशीच काहीशी रंजक गोष्ट समोर आली.
झालं असं की, नितू शुत्तर्ण वाला हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढले. या मतदारसंघात काँग्रेस, बसप आणि आम आदमी पक्षाची ताकद असलेल्या या मतदारसंघात नितू शुत्तर्ण वाला यांनी आपलं नशीब आजमवाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आलं. मात्र, नितू शुत्तर्ण वाला यांना आपल्या पराभवाची चिंत नाही किंवा दु:खही नाही. त्यांच्या काळजीचे आणि दु:खाचे कारण वेगळे आहे.
अपक्ष म्हणून लढलेल्या नितू शुत्तर्ण वाला यांना केवळ पाच मंत मिळाली. वाला यांना केवळ पाच मतं मिळाली, याचे त्यांना दु:ख नाही. त्यांची तक्रार वेगळी आहे.
Iss independent candidate ko total 5 votes padi hain aur iske ghar mein 9 log hain??????????? pic.twitter.com/E6f9HJXCYA
— Rishav Sharma (@rishav_sharma1) May 23, 2019
नितू शुत्तर्ण वाला यांच्या कुटुंबात एकूण 9 सदस्य आहेत आणि त्यांना मतं केवळ 5 मिळाली. “माझ्या कुटुंबात 9 सदस्य असताना, मला केवळ 5 मतं कशी मिळाली?” असा सवाल नितू शुत्तर्ण वाला यांनी उपस्थित केला आहे.
पंजाबमधील स्थानिक वृत्तवाहिनीने नितू शुत्तर्ण वाला यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी 9 सदस्यांच्या घरातील केवळ 5 मतं मिळाल्याची खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आणि थेट हंबरडाच फोडला. नितू शुत्तर्ण वाला हे कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडले. यावेळी वाला यांनी ईव्हएमवरही शंका घेतली.
पंजाबी वृत्तवाहिनीशी नितू शुत्तर्ण वाला यांनी केलेल्या बातचितीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ‘टीव्ही 9 मराठी’ने निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नितू शुत्तर्ण वाला यांच्या दाव्याची पडताळणी केली असता, तिथे वाला यांना 856 मतं मिळाली. दुसरीकडे, जालंधर (पंजाब) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संतोकसिंग चौधरी विजयी झाले आहेत.