Jalgaon Bank : जळगाव जिल्हा बँकेचं अखेर ठरलं, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर अध्यक्षपदी, शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं (Jalgaon DCC Bank) अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता अखेर संपली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या गळ्यात अखेर जळगाव जिल्ह‍ा बँक अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

Jalgaon Bank : जळगाव जिल्हा बँकेचं अखेर ठरलं, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर अध्यक्षपदी, शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी
गुलाबराव देवकर
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 1:49 PM

जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं (Jalgaon DCC Bank) अध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता अखेर संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) यांच्या गळ्यात अखेर जळगाव जिल्ह‍ा बँक अध्यक्षपदाची माळ पडली आहे. तर, शिवसेनेला (Shivsena) उपाध्यक्षपद देण्यात आलं असून श्याम सोनवणे (Shyam Sonavane) हे उपाध्यक्ष होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीला अध्यक्षपद तर शिवसेनेला उपाध्यक्षपद

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी चेअरमनपदासाठी गुलाबराव देवकर यांना तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. आज जिल्हा बँकेत पहिल्या तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांना संधी देण्यात आली आहे. तर,शिवसेनेनं श्याम सोनवणे यांची निवड केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंना सर्वाधिकार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर काल शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देण्यात आले होते. तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंददाराआड बैठकीत पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली आहे. तर सेनेकडून पुढील दोन वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत.

जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्यासह इतर संचालक जिल्हा बँकेत दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्ष पदासाठी गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढील दोन वर्षांसाठी नवा अध्यक्ष निवडण्यात येईल.

गुलाबराव देवकरांना घरकूल घोटाळा प्रकरणी दिलासा

घरकुल प्रकरणात धुळे न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत गुलाबराव देवकर यांच्या निवडीवर टांगती तलवार होती. मात्र, धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने व त्यांच्या जिल्हा बॅकेंच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्याने गुलाबराव देवकरांना दिलासा मिळाला आहे.

इतर बातम्या:

ST Strike Overall | आतापर्यंत 9 हजार 141 आंदोलनक एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

महाराष्ट्रानं ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांची माहिती दिली नाही: मनसूख मांडवीय

Jalgaon District Central Co Operative bank Gulabrao Devkar elected as President form NCP and Shyam Sonavane elected as vice president from Shivsena

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.