अजितदादा आमच्याकडे येणारच, त्यानंतर मोठा गौप्यस्फोट करणार; गुलाबराव पाटलांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया
Gulabrao Patil on Ajit Pawar : अजित पवार, युती अन् मविआचं सरकार पाडण्यासाठीच्या बैठका; गुलाबराव पाटील यांची एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रिया
विकास भदाणे, जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नाराजी अन् युतीशी संभाव्य हात मिळवणी, यावर मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.अजित पवार युतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार युतीसोबत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
दादा येणारच!
अजितदादा पवार लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
अजित पवार यांचं कालचं वक्तव्य
काल महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं. काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 हून जास्त बैठका झाल्याचं म्हटलं होतं. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. त्याबाबत गुलाबराव पाटलांना विचारलं असता त्यांनी हा दावा केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केलाय. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमच्याकडे येत आहेत. अजितदादा आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या, हे सांगू असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू अजित पवार!
सध्याच्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार केंद्रस्थानी आहेत. अजित पवार भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवार यांची प्रत्येक कृती अन् त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत असतात. काल अजित पवार यांना वज्रमूठ सभेत केलेल्या भाषणावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. गुलाबराव पाटलांनी अजित पवार सोबत येणार असल्याचा दावा केला आहे.