धुळे : कोरोना काळात केंद्र सरकारने राज्यांना मदतीचा हात दिला, लसीचे उत्पादन करून मोफत डोस दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक मदत या काळात झाली. परंतु महाविकास आघाडी सरकारने या काळात जनतेला मदत देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद न करता केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलं. धुळे येथे जन आशीर्वाद यात्रेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. (Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over Lack of health facilities)
केंद्रीय मंत्रीपदाचा वापर करून उत्तर महाराष्ट्रात आरोग्य सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. या वेळी व्यासपीठावर माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी पर्यटन मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, यात्रा संयोजक आ.डॉ अशोक उईके, यात्रा सहसंयोजक किशोर काळकर,आ. राजेश पाडवी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, काळकर, आ. अमरीश पटेल, आ. काशीनाथ पावरा आदी उपस्थित होते. धुळे शहरात जन आशीर्वाद यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.
दरम्यान, डॉ. भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा काल नंदूरबार जिल्ह्यात होती. नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देणार, असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. तसंच नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीकाही भारती पवार यांनी केलीय.
तळोदा येथील आदिवासी विकास भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके, जनजातीय राज्यक्षेत्र संपर्कप्रमुख किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाल्या की, नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे त्वरीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या आदिवासी कल्याणकारी योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करण्यावर अधिक भर देईन.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले त्यांचे दोंडाईचा शहरात भव्य स्वागत करण्यात आले. @BJP4Maharashtra @DrBharatippawar pic.twitter.com/pdHzGXzTS1
— Jaykumar Rawal (@JaykumarRawal) August 20, 2021
इतर बातम्या :
Dr. Bharti Pawar criticizes Mahavikas Aghadi government over Lack of health facilities