Ajay Chaudhary Appointment Dispute : गटनेतेपदाच्या नियुक्तीत झोल? पुरेसं संख्याबळ नसताना निवड कशी, खोट्या स्वाक्षऱ्या, शिंदे समर्थक आमदारांचा दावा

पुरेसं संख्याबळ आणलं कुठून, असे सवाल एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी केले आहेत.

Ajay Chaudhary Appointment Dispute : गटनेतेपदाच्या नियुक्तीत झोल? पुरेसं संख्याबळ नसताना निवड कशी, खोट्या स्वाक्षऱ्या, शिंदे समर्थक आमदारांचा दावा
अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्तीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 7:06 PM

मुंबई : शिवसेनेतील नाराज मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर गटनेतेपदी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण, पुरेसं संख्याबळ नसताना, आमच्याकडे 35 आमदार असताना, पुरेसं संख्याबळ आणलं कुठून, असे सवाल एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी (MLA) केले आहेत. त्यामुळे अजय चौधरी यांची नियुक्ती वादात अडकण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार सूरतमध्ये आहे. त्यामुळे कधीही हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी सूरतमध्ये जाणून एकनाथ शिंदेंची मनधरणी केली. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही.

गटनेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी

दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीतएकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरउद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गटनेतेपदावरुन त्यांची उचलबांगडी केली आहेत्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहेयाचाच अर्थ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे मार्ग प्रत्यक्ष चर्चेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी थांबवल्याचा हा संदेश मानला जातो आहे.

हे सुद्धा वाचा

35 आमदार शिंदेंकडे

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहेत्यामुळे विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहेज्या बैठकीत हा निर्णय झालात्या ठिकाणी शिवसेनेचे बहुसंख्य आमदार उपस्थितच नसल्याचा दावा करण्यात येते आहेत्यामुळे विधिमंडळ गटनेते पदावरुन शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेआता शिवसेना आमदारांचे संख्याबळ कुणाकडे किती आहेहे स्पष्ट होत नाहीतोपर्यंत हा वाद चिघळत राहणार असल्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडील आमदारांचं संख्याबळ आणि वाद

  1. एकनाथ शिंदे गट – 35 आमदार
  2. शिवसेना – 14 आमदार
  3. सध्या गटनेते एकनाथ शिंदे
  4. गटनेतेपदावरुन शिंदेंना शिवसेना हटवू शकत नाही.
  5. गटनेतेपदावरुन हटवण्यासाठी शिवसेनेकडे कमी संख्याबळ
  6. शिवसेनेते फूट पडण्याची शक्यता
  7. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशी फूट पडणार?

शिवसेना अडचणीत येणार?

गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण, पुरेसं संख्याबळ नसताना, आमच्याकडे 35 आमदार असताना, पुरेसं संख्याबळ आणलं कुठून, असे सवाल एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी केले आहेत. आधीच एकनाथ शिंदे यांच्यासह 35 आमदार सूरतमध्ये आहे. त्यामुळे कधीही हे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.