बांगलादेश मुक्ती आंदोलनात नक्की अटक कधी?, जेल, पोलीस स्टेशन कोणते?; जयंत पाटलांचा खोचक सवाल
बांगलादेश मुक्ती लढ्यात आपणही तुरुंगवास भोगला होता. (jayant patil criticized modi's statement to went jail for bangladesh freedom)

मुंबई: बांगलादेश मुक्ती लढ्यात आपणही तुरुंगवास भोगला होता. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींना बांगलादेश मुक्ती आंदोलनात नक्की अटक कधी झाली? त्याची कोणत्या पोलीस ठाण्यात नोंद आहे? त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते? असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil criticized modi’s statement to went jail for bangladesh freedom)
जयंत पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधानांना हा खोचक सवाल केला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा. मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले?, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते? याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा चिमटा पाटील यांनी काढला आहे.
सोशल मीडियातून टीका
बांगलादेशाच्या दौर्यावर असताना बांगलादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियातून जोरदार खिल्ली उडवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनीही पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा, असा खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते मोदी?
बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मोदी 26 मार्च रोजी ढाक्यात आले होते. यानिमित्ताने ढाका येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो, असं मोदी म्हणाले होते. त्यावरून विरोधकांनी मोदींवर टीका सुरू केली होती. तर सोशल मीडियातून मिम्सद्वारे मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली जात होती.
मोदींच्या भेटीगाठी
यावेळी मोदींनी बांगलादेशचे राजकारणी आणि कलाकारांचीही भेट घेतली होती. बांगलादेशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही ते भेटले. शिवाय बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन यालाही मोदी भेटले. शिवाय येथील भारतीयांना भेटतानाच वोहरा समुदायाच्या लोकांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी गुजरातीत संवाद साधला होता. (jayant patil criticized modi’s statement to went jail for bangladesh freedom)
आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 29, 2021
संबंधित बातम्या:
बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो: PM मोदी
मोदी बांगलादेशच्या दौऱ्यातून बंगाल, आसामचे सत्ता समीकरण साधणार?; वाचा, सविस्तर
बंगाल-आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावणार; वाचा, कुणाचं किती पारडं जड!
(jayant patil criticized modi’s statement to went jail for bangladesh freedom)