भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधी कळतं त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल
जयंत पाटील, अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 4:15 PM

मुंबई : आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलं असून भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे, अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. (Jayant Patil criticizes BJP over Income Tax Department raid on Ajit Pawar)

आजपासून राज्यातली धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली आहेत. सकाळी मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधी कळतं त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे. यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

‘अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही’

अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्च येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. लखीमपूर येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर कृत्य तिथे केले गेले होते. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपला हे सहन झाले नसेल म्हणून ही कारवाई करण्यात आली असेल असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

देशाच्या एजन्सी भाजप चालवतंय

आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आमचे सर्व नेते सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांनी केलेला नसताना केवळ धाडसत्रं करून त्यांना बदनाम केलं जात आहे. आमच्या लोकांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. काल परवा एनसीबीच्या रेडमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे या देशाच्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही. त्यामुळे समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामोहरण करणं हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यापेक्षा वेगळं काही आहे असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Ajit Pawar : अजित पवारांवर IT च्या धाडी, पार्थ पवार आणि बहिणींच्या कंपन्यांचीही चौकशी

झेडपी, पंचायत समितीचा निकाल आणि आयटीच्या छाप्याचा संबंध आहे का? रोहित पवारांचा खोचक सवाल

Jayant Patil criticizes BJP over Income Tax Department raid on Ajit Pawar

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.