भर प्रचारसभेत जयंत पाटलांनी तोंडावरचा मास्क काढला अन् म्हणाले…

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. (jayant patil reaction on corona surge)

भर प्रचारसभेत जयंत पाटलांनी तोंडावरचा मास्क काढला अन् म्हणाले...
jayant patil
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 2:05 PM

पंढरपूर: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पाटील यांनी प्रचारसभांवर भर दिला असून आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पाटील यांनी एका प्रचारसभेत चक्का मास्क काढून भाषण केलं. बरं, नुसता मास्क काढून पाटील थांबले नाहीत, तर मास्क काढण्याचं समर्थनही त्यांनी केलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (jayant patil reaction on corona surge)

आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला जयंत पाटलांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असं म्हणत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र, मास्क काढण्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजपने पंढरपूरचा विकास रोखला

भगीरथ भालके यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करा आणि भगीरथ यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवा, असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. गेल्या निवडणुकीतील महाविकास आघाडीची मतेही भालके यांनाच मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत भालके हे विरोधात असल्याने भाजप सरकारच्या काळात पंढरपूर मतदारसंघाचा विकास झाला नाही. भारत नानांनी अधिकाऱ्यांशी भांडून पंढरपूरच्या विकासाची कामे सुरू केली, असंही ते म्हणाले.

कोणत्या तुरुंगात गेला?

यावेळी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही टीका केली. काँग्रेसच्या काळात जे काम करण्यात आलं, त्याचं क्रेडिट घेण्याचं काम सुरू आहे. भारतातील मोठ्या नेत्यांची बरोबरी करण्याचं काम मोदी करत आहेत. बांगलादेशच्या निर्मितीचं श्रेय इंदिरा गांधी यांना जातं. आता मोदी आपणच जेलमध्ये गेल्याचं सांगून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशाच्या मुक्ती लढ्यावेळी मोदी कोणत्या तुरुंगात गेले होते काय माहिती, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी सरकारचं काम देशविरोधी

केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून देशात महागाई वाढवत आहे. कृषी विधेयकाला विरोध सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात 250 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मृत्यू झाला आहे. मोदी सरकार कोणताही निर्णय घेत नाही. पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने बँकांचे व्याज दर कमी केले, असं सांगतनाच मोदी सरकार देशविरोधी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आघाडी अडचणीत येणार नाही

भाजप सरकारने कामगार कायदा करून कामगारांचे काम बंद केले आहे. गेल्या पाच वर्षात देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे, असं सांगतानाच राज्यात महाविकास आघाडी प्रामाणिकपणे काम करत आहे. परंतु, सरकारवर टीका करण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे, असंही ते म्हणाले. तसेच आघाडी सरकार कोणत्याही प्रकरणात अडचणीत येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (jayant patil reaction on corona surge)

संबंधित बातम्या:

पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची तयारी, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर

लॉकडाऊन नकोच, आम्हाला आमच्या नशीबावर सोडा: राजू शेट्टी

चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?; हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला

(jayant patil reaction on corona surge)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.