Rajya Sabha Election: एमआयएमसोबत चर्चा करणार का?; जयंत पाटील यांच्या ‘त्या’ विधानाने संभ्रम कायम

Rajya Sabha Election: महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Rajya Sabha Election: एमआयएमसोबत चर्चा करणार का?; जयंत पाटील यांच्या 'त्या' विधानाने संभ्रम कायम
जयंत पाटील निराशImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 2:32 PM

मुंबई: आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही. कुणी भेटायला आलं आणि जाहीरपणे पाठिंबा मागितला तर आम्ही पाठिंबा देऊ, असं विधान एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. त्यामुळे एमआयएमच्या (aimim) आमदारांशी महाविकास आघाडीने अद्याप कोणीह संपर्क साधला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. वेगवेगळ्या स्तरावर चर्चा सुरू आहेत. योग्यवेळी याबाबत भाष्य करू, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयएम हा राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याशी बोललं पाहिजे. समाजवादी पार्टी काँग्रेससोबत आहे. त्यामुळे आम्ही सपाशी बोलू, असं काँग्रेसचे नाना पटोले (nana patole) यांनी म्हटलं होतं. पण पाटील यांनी कोणतंही थेट विधान न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाविकास आघाडी अडचणीत वगैरे काही नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते. परंतु समाजवादी पक्ष हा भाजपविरोधी उत्तरप्रदेशमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचा मुलाधार तोच आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

म्हणून आमदारांना आणलं

सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोर्चे बांधणी करणारच ना

मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच ना. या निवडणूका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच. त्यात दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला 170 आमदारांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

योग्यवेळी विधान परिषदेची नावे जाहीर करू

आज विधानसभेच्या सर्व सदस्यांना महाविकास आघाडीकडून सूचना गेल्या आहेत. बहुसंख्य आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्या सर्वांसाठी ही बैठक होती. दरम्यान विधानपरिषदेसाठी चर्चा सुरू असून दोन जागा आमच्या असून दोन जागांसाठी चर्चा सुरू आहे. त्याचा योग्यवेळी निर्णय जाहीर करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.