भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित, त्यामुळेच नेते कामाला लागले, जयंत पाटलांचा टोला

विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकासआघाडी जिंकणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. (Jayant Patil said MVA will win all seats of Mlc election)

भाजपचा मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव निश्चित, त्यामुळेच नेते कामाला लागले, जयंत पाटलांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 6:53 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघापैकी राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद आणि पुणे पदवीधरमधून निवडणूक लढवत आहे. तर, काँग्रेस नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ आणि अमरावतीमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्यामुळे त्यांचे नेते कामाला लागले असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. (Jayant Patil said MVA will win all seats of Mlc election)

महाविकास आघाडीकडून पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसकडून अभिजीत वंजारी, पुणे शिक्षकमध्ये जयंत आसनगावकर, अमरावतीत शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे निवडणूक लढवत आहेत. हे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारबद्दल काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे, असं म्हटलं. राज्य सरकारपुढे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणं राज्य सरकारचं काम आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्वच राज्यांची आर्थिक स्थिती बिकट झालीय. महराष्ट्रात अर्थमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मार्ग काढण्याचे काम सुरु आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांना मदत मिळावी अशी काँग्रेसची भावना होती. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, त्यामुळे नाराजी नाही. सरकार एक आहे, कोणाच्याही खात्यात निर्णय होतो हा सरकारचा निर्णय असतो. एकत्र बसून निर्णय होत असल्यामुळे नाराजी नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. त्यामुळे भाजपला कंबर कसावी लागणार आहे, असं जंयत पाटील म्हणाले. भाजपनं आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बैठक घेतली त्यावरुन जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील माहिती स्पष्ट आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सरकारनं अटक केली आहे. हे सर्व असताना सीबीआय चौकशी करण्याची काय गरज आहे, असा सवाल जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. केंद्र सरकारनं सीबीआयचा विरोधकांविरोधात सीबीआयचा वापर करण्याची गरज नाही, असही पाटील म्हणाले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पारदर्शकपणे काम करतात. त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही अडचणी असतील असं वाटत नाही. ते नेहमीच सार्वजनिक आयुष्यात पारदर्शकपणे वावरले होते, असं जयंत पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील

(Jayant Patil said MVA will win all seats of Mlc election)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.