“हातात असलेले यश गमावण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे…” जयंत पाटलांचा दिलीप सोपल यांना चिमटा

| Updated on: Feb 23, 2022 | 1:53 PM

राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांची आज सोलापूर जिल्ह्यातील वैरागमध्ये जाहीर सभा झाली, या सभेत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना जंयत पाटील यांनी दिलीप सोपल यांना टोला लगावला.

हातात असलेले यश गमावण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे...  जयंत पाटलांचा दिलीप सोपल यांना चिमटा
जयंत पाटील
Follow us on

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (Jayant Patil) यांची आज जिल्ह्यातील वैरागमध्ये जाहीर सभा झाली, या सभेत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना जंयत पाटील यांनी म्हटले की, 2019 मध्ये आता काय राष्ट्रवादीची सत्ता येत नाही असे वाटून अनेक जण राष्ट्रवादीला सोडून गेले. मात्र त्यानंतर जे झाले ते सर्वांनीच पाहिले. पवार साहेबांनी (Sharad Pawar) निवडणुकीची सुत्रे हातात घेतली, झंजावती दौरे काढले आणि राष्ट्रवादीची सत्ता देखील आली. जेव्हा अनेक जण राष्ट्रवादीला सोडून बाहेर पडत होते, त्या काळात निरंजन भूमकर हे कायम राष्ट्र्वादीसोबत राहिले. हातात असलेले यश कसे गमावतो याचे इथे अनेकजण उत्तम उदाहरण आहेत, असे म्हणत त्यांनी दिलीप सोपल यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. 

…आज त्यांना पश्चताप होतो

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पक्षवाढीसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जात आहोत. वैराग नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता आणली. मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की बार्शी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. वैराग नगरपंचायतीला जो काही निधी लागेल तो आम्ही देऊ. 2019 मध्ये अनेक जण राष्ट्रवादी सोडून गेले मात्र त्यांना आपण तेव्हा राष्ट्रवादी उगच सोडली याचे दु:ख वाटत असेल असे यावेळी जंयत पाटील यांनी म्हटले आहे.

नवाब मलिकांवर प्रतिक्रिया

दरम्यान या सभेनंतर त्यांनी नवाब मलिक यांच्या प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेली ही कारवाई म्हणजे सत्तेचा दुरपयोग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणीतही माहिती न देता मलिक यांना चौकशीला घेऊन जाणे म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे. तसेच भाजपावर मलिक यांनी आरोप केले त्याच रागातून ही कारवाई करण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

ठाकरे-पवार माफियांना मदत करतात; 19 बंगल्यांबद्दल का बोलत नाही, राज्यपालांच्या भेटीनंतर सोमय्यांचा सवाल

‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!

…म्हणून युवराजांना पेंग्विन म्हणताना महापौर उत्साहात दिसत होत्या; नाव न घेता नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला