AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayashree Patil Bail Application : जयश्री पाटील यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव, अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणात आरोपी

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरती हल्ला केल्यानंतर कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस चौकशी करीत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक लाख कामगारांकडून साधारण दोन कोटी रूपये घेतल्याचे उघडकीस आले आहे.

Jayashree Patil Bail Application : जयश्री पाटील यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव, अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणात आरोपी
अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पू्र्णImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:17 PM

मुंबई – एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरती हल्ला केल्यानंतर कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस चौकशी करीत असताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक लाख कामगारांकडून साधारण दोन कोटी रूपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 80 लाख रूपये जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्याकडे आहेत असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. त्याआधारे पोलिसांनी जयश्री पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. अनेक दिवसांपासून त्या गायब होत्या. पोलिस त्यांचा शोध घेत होते. आज जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतल्याची माहिती मिळत आहे.

गच्चीवर झालेल्या बैठकीत त्या दिसल्या होत्या

जयश्री पाटील यांच्या विरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापुर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवरती एक बैठक झाली होती. विशेष म्हणजे त्या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल सुध्दा झाला होता. त्या बैठकीत जयश्री पाटील सुध्दा दिसल्या होत्या. ज्यावेळी एसटी कामगारांकडून पैसे घेण्यात आले त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारची पावती देण्यात आलेली नाही. त्याचा साधा हिशोब सुध्दा दिलेला नाही असे रिमांड कॉपीत असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितली आहे.

दोन कोट रूपयांचं केलं काय ?

त्यामुळे या रिमांड कॉपीनुसार जयश्री पाटील सध्या पोलिसांसाठी आरोपी आहे. मागच्या काही दिवसांपासून त्या कुठे आहेत पोलिसांना सापडत नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पथक सुध्दा तयार केले आहे. हे पथक सध्या त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना त्या सापडल्या नाही तर न्यायालयात त्यांना फरार घोषित करू शकतात. त्यानंतर त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात येईल. पोलिसांच्या तपासात त्यांनी कामगारांकडून 2 कोटी जमा केले आहेत. यामुळे कदाचित न्यायालय या काळात त्यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली आहे काय ? ते याच पैशातून केली आहे का ? हे तपासले जाईल त्याकरता ती मालमत्ता जप्तही केली जाऊ शकते असे कायदेतज्ज्ञ म्हणत होते.

Nawab Malik ED : दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ

Nashik police Order : सरकार हिंदूवर ‘जझिया’ करही लावणार का; नाशिक पोलीस आयुक्तांच्या भोंग्यावरच्या ऑर्डरवर भाजपचा सवाल

Photo Gallery : धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे; सत्याने वर्तावे इशासाठी…!

S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.