Jitendra Awhad : ‘महामहिम बोललं जातं, पण आता त्यांची लायकी राहिली नाही’, राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक
ज्यावेळी राज्यपालांनी महात्मा फुलेंचा (Mahatma Phule) अपमान केला होता तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे होती. त्यांना महामहिम बोललं जात होतं, पण तशी त्यांची लायकी उरलेली नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केलीय.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. तसंच कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकाही सुरु झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ज्यावेळी राज्यपालांनी महात्मा फुलेंचा (Mahatma Phule) अपमान केला होता तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे होती. त्यांना महामहिम बोललं जात होतं, पण तशी त्यांची लायकी उरलेली नाही, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केलीय.
‘आमच्या मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बोलाल तर याद राखा’
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांना मराठी माणसांची किंमत समजली नाही. ज्या दोन समाजाबाबत ते बोलले त्यांच्या समाजाबद्दल मला नितांत प्रेम आहे. पण गुजरात आणि राजस्थान जाऊन का नाही मोठे झाले? जी जनसंपत्ती त्यांच्या घरी आहे ती मराठी माणसाच्या घामाटी आहे. मराठी माणसांनी इथे घाम गाळला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का पोहोचला तर ते ऐकून घेणार नाही. आम्ही नाही शांत बसू शकत. मुंबईबद्दल बोलल्यामुळे तमाम लोकांच्या मनात राग आहे. मुंबईसाठी आम्ही रक्ताचे पाट वाहिले आहेत. मुंबईमध्ये आमचे ऋणानुबंध आहेत. मुंबईतच पहिलं स्टॉक एक्सचेंज सुरु झालं आहे. इथे असलेल्या मोठ्या कंपन्या का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठ्या झाल्या? मराठी माणूस इथे पडणाऱ्याला सावरुन उचलून घेतो. आज तुम्ही सह्याद्रीचा अपमान केला. राज्यपाल कोश्यारी तुम्ही माफी मागितलीच पाहिजे. तुमची लायकी नाही, आमच्या मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बोलाल तर याद राखा, असा इशाराच आव्हाड यांनी राज्यपालांना दिलाय.
‘राष्ट्रवादी काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार’
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस जोडे मारो आंदोलन करणार आहे. कोल्हापुरी जोडे आम्ही त्यांना भेट देणार आहोत. कोश्यारी यांच्या बोलण्यातून मराठी माणसाची अस्मिता आता सांगावी. मराठी माणूस लढा देत आलाय. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. जगातील मोठा औद्योगिक पट्टा महाराष्ट्रात होता. जेवढ्या बोटी मुंबईतून बाहेर जातात, तेवढ्या देशभरात कुठेच उतरत नाहीत. कोश्यारी यांचं दरवेळी नाटक असतं. त्यांचं महात्मा गांधी यांच्याबद्दलचं वाक्यही खूप घृणास्पद होतं. मराठी अस्मितेला ठेच पोहोचवणाऱ्याला माफ करणार नाही. कोश्यारी आपल्या पदाचा नेहमी गैरवापर करत आहेत. मराठी माणसानी गुजरात्यांना आणि अन्य लोकांना वाटा दाखवल्या. मुंबईत गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात होते, त्यांचा घामाचा अपमान कोश्यारी यांनी केल्याचं आव्हाड म्हणाले.
आता राज्यपालांना वापर बोलवा नाही तर आता राज्यपाल भगाव. 1960 मध्ये 105 मराठी लोक बंदुकीच्या समोर गेले. आमच्या मुंबईबद्दल बोलून आम्ही ऐकणार येवढे आम्ही कायर नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी राज्यपालांना थेट इशारा दिलाय.