Jitendra Awhad : एसी विरुद्ध नॉन एसी लोकल, जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा तर वर्ग संघर्षाचा लढा

Jitendra Awhad : गरीब कष्टकरी माणूस एसी विरुद्ध भांडत नाही. तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करुन तो अस्तित्वाची लढाई लढतोय. तो कोणाविरुद्ध लढत नाहीये तो स्वतःच्या अस्तित्वासाठी, जिवंत राहण्यासाठी झगडतोय.

Jitendra Awhad : एसी विरुद्ध नॉन एसी लोकल, जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा तर वर्ग संघर्षाचा लढा
एसी विरुद्ध नॉन एसी लोकल, जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा तर वर्ग संघर्षाचा लढाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 9:40 AM

ठाणे: एसी विरुद्ध नॉन एसी लोकलच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांनी तर एसी विरुद्ध नॉन एसी लोकलच्या (AC Local) वादाला वर्ग संघर्षाचीच उपमा दिली आहे. आज कळव्यामध्ये दीड दिवसाच्या गणपतीच्या दर्शनाकरिता (Ganesh Utsav) काही जणांच्या घरी तसेच सोसायट्यांमध्ये फिरत असताना लोक फक्त एकच मुद्दा मांडत होते. काहीही करा पण एसी लोकल बंद करा. या लढ्याच रुप मला आता वर्ग संघर्षाच्या लढ्यासारख दिसतंय. एसी विरुद्ध नॉन एसी, असं ट्विटचं जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांनी सलग तीन ट्विट करून या वादावर भाष्य केलं असून नॉन एसी लोकलची संख्या वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे.

मी साध्या लोकलच्या बाजूने म्हणजेच ज्यांची संख्या ट्रेनने प्रवास करणाऱ्यांमध्ये 90 टक्के इतकी आहे, त्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यामुळे उर्वरित 10 टक्के ज्यांना एसी लोकल हवी आहे, ते माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत. त्याच्याने मला काहीही फरक पडत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

गरीबांच्या अस्तित्वाची लढाई

गरीब माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जगणार कसा याची लढाई आहे. गरीब कष्टकरी माणूस एसी विरुद्ध भांडत नाही. तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करुन तो अस्तित्वाची लढाई लढतोय. तो कोणाविरुद्ध लढत नाहीये तो स्वतःच्या अस्तित्वासाठी, जिवंत राहण्यासाठी झगडतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लाँग मार्चचा इशारा

सेंट्रल रेल्वेने एसी लोकलची संख्या वाढवल्याने नॉन एसी लोकलच्या वेळा वाढल्या आहेत. त्यामुळे नॉन एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असून चाकरमान्यांना प्रवास करणं कठिण होत आहे. या विरुद्ध बदलापूरपासून ते कळव्यापर्यंतच्या प्रवाशांनी आंदोलन करत आक्रोशाला वाट मोकळी करून दिली होती. या आंदोलनात आव्हाड यांनीही उडी घेऊन मध्य रेल्वेला धारेवर धरलं होतं. कळवा कारशेडमधून व इतर रेल्वे स्थानकातून सकाळच्या गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या एसी लोकल बंद करून त्याऐवजी साध्या लोकल सुरू कराव्यात तसेच कळवा- मुंब्रा दरम्यान धीम्या मार्गावरून जाणाऱ्या मेल गाड्यांचा आवाज बंद करावा. अन्यथा, 2 ऑकटोम्बर गांधी जयंती दिवशी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच पश्चिम रेल्वे स्थानकातील त्रासलेले प्रवाशी आपापल्या स्थानकातून लाँगमार्च काढतील असा इशारा आव्हाड यांनी दिला होता.

साध्या लोकलची संख्या वाढवा

दरम्यान, सर्व सामान्य प्रवाश्यांना सकाळच्या वेळी कळवा स्थानकातून मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागत असून रेल्वे प्रशासन गोरगरीब प्रवाशांची टिंगल करीत आहे. साध्या लोकलची संख्या कमी करून ऐसी लोकलची संख्या वाढवली जात आहे. जर एसी गाडीत गर्दी वाढली तर बंद दरवाजांमुळे अनेक प्रवाशी गुदमरतील, अन् आपण ते सहन करणार नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने साध्या गाड्यांची संख्या वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.