थोडेसे मतभेद असतात, पण आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे : जितेंद्र आव्हाड
येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी (Jitendra Awhad On NCP-cong disappointed) दिली.
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. त्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले. (Jitendra Awhad On Maha vikas aaghadi NCP-cong disappointed)
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये नाराजी नाट्यावर भाष्य केले. “लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थिती आम्ही पूर्ण ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.”
नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती तसेच लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत बैठक घेतली होती. या बैठकीला मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते.
नवी मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7 हजारांच्या वर गेली आहे. नवी मुंबईत दररोज 150 ते 200 रुग्ण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ज्या उपाययोजना लागतील त्या त्वरीत उभा करण्याचे आदेश मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांना देण्यात आले आहेत. नवी मुंबईत कोरोना संख्या वाढत आहे. तर कोरोना टेस्ट लॅब अद्याप सुरु होत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी
राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. ही बैठक जवळपास 1 तास सुरु (Jitendra Awhad On Maha vikas aaghadi NCP-cong disappointed) होती.
संबंधित बातम्या :
कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत शरद पवारांची तासभर चर्चा