‘आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी केलीय.

'आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते', जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड, चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:10 PM

मुंबई : राष्ट्रवाद काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. त्यावेळी आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत (OBC Community) एक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी केलीय.

जितेंद्र आव्हाडांचं नेमकं वक्तव्य काय?

‘खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि ताता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

आव्हाडांच्या वक्तव्यानंतर बावनकुळे आक्रमक

तर आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड हे नेहमीच धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवलं गेलं, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. आव्हाडांनी असं वक्तव्य केल्यानं त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावं लागेल. त्यांच्यासारख्या कल्पित लोकांमुळेच आरक्षण केलं. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी आव्हाडांना दिलाय.

आव्हाडांनी माफी मागावी, बावनकुळेंची मागणी

‘राजकारण आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणीही बावनकुळे यांनी केलीय.

इतर बातम्या :

Maharashtra School Update : राज्यात कोरोनामुळे चिंता वाढली, मुंबईसह कोण-कोणत्या शहरातील शाळा बंद करण्याचा निर्यण?

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.