जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा आता गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने विवाह! आव्हाडांकडून टीकाकारांना उत्तर
कोरोना संकटाच्या काळात कुठलाही झगमगाट न करता आव्हाड यांनी आपल्या लेकीचं लग्न अगदी साधेपणानं लावत एक आदर्श घालून दिल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे आव्हाड यांच्या मुलीचंच गोव्यात अगदी धुमधडाक्यात लग्न साजरं झाल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता आव्हाडांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलीचं लग्न 7 डिसेंबरला त्यांनी अगदी साधेपणानं लावलं. आपल्या घरी रजिस्टर विवाह (Register Marriage) करुन देत त्यांनी मुलीला सासरी पाठवलं. त्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. कोरोना संकटाच्या काळात कुठलाही झगमगाट न करता आव्हाड यांनी आपल्या लेकीचं लग्न अगदी साधेपणानं लावत एक आदर्श घालून दिल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे आव्हाड यांच्या मुलीचंच गोव्यात अगदी धुमधडाक्यात लग्न साजरं झाल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता आव्हाडांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे.
‘काही विकृतांच्या माहितीसाठी अॅलन हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करावं लागलं. त्याच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी गोवा हे ठिकाण निवडलं. अॅलन आणि नताशा हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत आणि ते एकमेकांच्या आवडी-निवडीचा आदर करतात’, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.
For the information of some perverts # #Alan is a #Christian so it had to b a Christian #wedding his family Chose #Goa #Alan had him choise him of wedding and #NATASHA had her own choice Both are different individuals and respected their choice of wedding pic.twitter.com/DizuqvQDZf
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 19, 2021
Every religion has its own rituals and that are to b respected Alan being a Christian had his own way of celebrations …. I m nobobdy to stop it ….
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 19, 2021
नताशा आणि अॅलनचा विवाह गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने पार पडला. गोव्यातील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये काही नेते मंडळी आणि बड्या लोकांची यावेळी उपस्थिती राहिली. या विवाहाच्या पूर्वसंध्येला संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे आव्हाड यांचा साधेपणाचा केवळ दिखावा होता का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याला उत्तर देत आव्हाडांनी हे ट्वीट केलं आहे.
7 डिसेंबरला साधेपणाने विवाह
नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा 7 डिसेंबर रोजी विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये झाले आहे. एलेन स्पेनमधल्या एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं.
इतर बातम्या :