‘आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’, भाजप नेत्याचा खोचक टोला

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय.

'आता राहुल गांधींनीच भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय', भाजप नेत्याचा खोचक टोला
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 4:18 PM

मुंबई : उत्तर प्रदेश काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद (Jiten Prasada) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जितिन प्रसाद यांनी नुकतीच अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय. (Nilesh Rane criticizes Rahul Gandhi over Jitin Prasad’s BJP entry)

“राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दात निलेश राणे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या धौराहा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यूपीए-2 सरकारच्या काळात जितिन प्रसाद यांनी पेट्रोलियम आणि रस्ते वाहतूक ही खाती सांभाळली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आजही उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एक संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून जितिन प्रसाद यांची ओळख आहे.

भाजप हाच खरा राष्ट्रीय पक्ष

मला याची जाणीव झाली की मी आता लोकांची मदत करू शकत नाही किंवा त्यांचे हितसंबंध जपू शकत नाही. माझ्या आयुष्याला नवी सुरुवात होत आहे. मला इतक्या वर्षांपासून साथ दिल्याबद्दल मी काँग्रेसमधील लोकांचे आभार मानतो. पण आता मी पूर्णपणे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे, असे उद्गार जितीन प्रसाद यांनी पक्षप्रवेशावेळी काढले.

संबंधित बातम्या :

‘अहंकाऱ्यांनो जरा शिका’; नितीन राऊतांकडून कार्टुनद्वारे पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला’, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

Nilesh Rane criticizes Rahul Gandhi over Jitin Prasad’s BJP entry

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.