JNU Attack : शांततेतील आंदोलन बघवत नाही का? : रोहित पवार
जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) परिसरात झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध (Rohit pawar comment JNU Attack) केला.
मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) परिसरात झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध (Rohit pawar comment JNU Attack) केला. “जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांचे फी दरवाढीविरोधात साबरमती हॉस्टेलसमोर गांधीजींच्या विचारानुसार शांततेतं आंदोलन सुरु होतं. मात्र काही लोकांना शांततेत आंदोलन केलेलं आवडत नाही का?” अशी टीकाही रोहित पवार यांनी (Rohit pawar comment JNU Attack) केली.
“जेएनयूमध्ये काल जी घटना झाली त्यात सर्वसामान्य मुलं मुली होते. गेल्या दोन महिन्यापूर्वी जी फी दरवाढ झाली होती. त्याविरोधात एक शांततेत गांधींजींच्या विचारावर आंदोलन सुरु होतं. साबरमती या हॉस्टेलजवळ हे आंदोलन सुरु होतं. मात्र हे आंदोलन सुरु असताना 40 मुलं त्यात ठिकाणी येतात. जर कोणत्याही इन्सिट्यूटमध्ये आत यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पास घ्यावा लागतो. तेथे नोंदणी करावी लागते. तुमची कागदपत्र द्यावी लागतात. मग अशा परिस्थितीत ती मुलं त्या ठिकाणी कशी आली?” असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.
तसेच युनिव्हर्सिटीच्या बाहेर पोलिस उपस्थितीत असतानाही ही घटना आत 2 ते अडीच तास सुरु होती. मग त्यावेळी पोलिस आत का गेले नाही? असेही ते यावेळी (Rohit pawar comment JNU Attack) म्हणाले.
“कुलगुरू हे विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या हितासाठी असतात. मात्र गेले दीड ते दोन महिने कुलगुरु दिसत नाही. काल (5 जानेवारी) सेमिस्टर परीक्षेची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती. यात 8 हजारांपैकी फक्त दोन हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरु शकले. कारण विद्यापीठातील इंटरनेट बंद होतं.” असेही रोहित पवार म्हणाले.
मग अशा सर्व परिस्थितीत त्या ठिकाणी मुल-मुलींना अतिशय वाईट पद्धतीने मारलं जातं. अशी घटना देशात घडत असेल. तर मग साबरमती हॉस्टेलसमोर गांधीजींच्या विचाराने शांततेत हे आंदोलन सुरु होतं. मात्र काही लोकांना शांततेत आंदोलन केलेलं आवडत नाही का? असेही रोहित पवार म्हणाले. जर शांततेत आंदोलन सुरु असेल तर मुद्दाम त्रास दिला जातो का? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित (Rohit pawar comment JNU Attack) केला.