कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा

माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा
Follow us
| Updated on: Sep 20, 2020 | 4:18 PM

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवली भागातील मनसेची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. (Kalyan Dombivali Shivsena BJP workers enter MNS)

माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काही दिवसांपूर्वीच वरळी मतदारसंघातील स्थानिकांनी मनसेत प्रवेश केला होता.

शिवसेना-भाजपच्या जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याने कल्याण डोंबिवली मनसेत चैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाट धरली. वरळीतील एनजीओ, सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते आणि काही सामान्य नागरिकांनी मनसेत प्रवेश केला.

“लोकप्रतिनिधी कसा असावा, तर लोकातला असावा. वरळी मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलं होतं, पण काही महिन्यातच इथल्या मतदारांना त्यांच्या कामाची प्रचिती आली. सध्या कोणतीही निवडणूक नाही. परंतु राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा या नागरिकांनी व्यक्त करत मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे” असे मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितले होते.

याआधी औरंगाबाद, मुंबई, पुणे अशा विविध भागात कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. पाठोपाठ खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

संबंधित बातम्या –

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

चंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

(Kalyan Dombivali Shivsena BJP workers enter MNS)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.