KDMC Election 2022, Ward 43 : झेंडा कुणाचा फडकणार? गड कोण राखणार? प्रभाग 43वर सर्वांच्याच नजरा!
प्रभाग क्रमांक 43 हा नव्याने अस्तित्वात आलेला प्रभाग आहे. या प्रभागात एकूण तीन वॉर्ड आहेत. त्यातील एक वॉर्ड अनुसूचित जाती महिला, दुसरा ओबसी आणि तिसरा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेची (kdmc) मुदत संपूनही दोन वर्षानंतर केडीएमसीची निवडणूक होत आहे. कोरोनाचं संकट आल्याने या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. आता या निवडणुका होत आहेत. त्यामुळे केडीएमसीच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केडीएमसीत शिवसेनेची सत्ता होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर एखाद दोन अपवाद वगळता सर्वच नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे केडीएमसीचं राजकीय गणितच बदललं आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेही भाजपच्या जवळ आली आहे. त्यामुळे शिंदे गट, मनसे आणि भाजप युती (bjp) पाहायला मिळाल्यास आश्चर्य नको. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक एक प्रकारचं आव्हान ठरणार आहे. शिवसेनेला केवळ शिंदे गटाचंच आव्हान नसणार आहे, तर उमेदवार मिळवण्याचं आव्हानही शिवसेनेसमोर ठाकणार आहे. त्यातच ओबीसी आरक्षणासह आता महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नवी विटी, नवा दांडू
प्रभाग क्रमांक 43 हा नव्याने अस्तित्वात आलेला प्रभाग आहे. या प्रभागात एकूण तीन वॉर्ड आहेत. त्यातील एक वॉर्ड अनुसूचित जाती महिला, दुसरा ओबसी आणि तिसरा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या वॉर्डांमधून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. नव्यानेच तयार झालेल्या मतदारसंघातून उभे राहून हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला करण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यातही शिंदे गटातून अनेकजण या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाग 43 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
आरक्षण काय?
यंदा केडीएमसीमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 43 अ हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला आहे. प्रभाग क्रमांक 43 ब हा ओबीसींसाठी तर प्रभाग क्रमांक 43 क हा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.
प्रभाग 43 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
37 हजार मतदारांच्या हातात सबकुछ
केडीएमसी महापालिकेत एकूण 37 हजार 109 मतदार आहेत. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 हजार 550 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 869 इतकी आहे.
प्रभाग 43 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
नव्या मतदारसंघातील परिसर कोणते?
या मतदारसंघात पिसवली गाव, देशमुख होम्स, अनमोल गार्डन, रिलॅक्स गार्डन, कृष्णा कंपनी, अष्टगंधा चाळी, एकलव्य कॉलनी, गांवदेवी मंदिर, दत्त मंदिर, पांडुरंग वाडी, गोळवलीचा काही भाग आणि बौद्ध विहार परिसर आदी भाग येतो.