कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट, उमेदवाराची फेर निवडणुकीची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा

कल्याण लोकसभा मतदारसंघात मतादानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला. मतदानासाठी नागरीक घराबाहेर पडले पण अनेकांचं मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यामुळे एका उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे फेर निवडणुकीची मागणी केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट, उमेदवाराची फेर निवडणुकीची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा
कल्याणमध्ये खरी लढत ही शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात होती
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 7:41 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत येत असतो. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अनेक महिन्यांपासून हा मतदारसंघ वारंवार चर्चेत येत होता. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. श्रीकांत शिंदे खासदार असताना या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात होता. या मतदारसंघात मधल्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच शितयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना अंतर्गत मतभेदांवर मार्ग काढावा लागला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. आता या निवडणुकीत कोण जिंकतं ते 4 जूनला स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी या मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराने फेर निवडणुकीची मागणी केली आहे.

फेर निवडणुकीची मागणी कुणी आणि का केली?

कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट आणणारा प्रकार घडला आहे. या मतदारसंघात नुकतंच लोकसभेचं मतदान पार पडलं. पण अनेक मतदारांचे नाव मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे मतदानापासून अशाप्रकारे वंचित राहणाऱ्या मतदारांचा आकडा हा तब्बल 80 हजार इतका असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक व्हावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. यासाठी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाला आमरण उपोषणाला बसण्याचा इशारादेखील दिला आहे.

“कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदार यादीतून 80 हजार मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे मतदानापासून 80 हजार मतदार वंचित राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर निवडणुकीचा निर्णय घ्यावा . फेर निवडणूकीचा निर्णय न झाल्यास २७ मे पासून आमरण उपोषणाला बसणार”, अशी भूमिका अभिजीत बिचुकले यांनी मांडली आहे. अभिजीत बिचुकले यांच्या मागणीत काहीसं तथ्य असल्याची चर्चा आहे. कारण तब्बल 80 हजार मतदारांना मतदान करता आलेलं नाही, असा दावा केला जातोय. या प्रकरणी निवडणूक आयोग आता काय निर्णय घेणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान?

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे.

कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अंबरनाथ –

  • एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 53 हजार 554
  • मतदान केलेले मतदार : 1 लाख 66 हजार 407 (एकूण टक्केवारी – 47.07 %.)
  • पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 844
  • मतदान केलेले पुरुष मतदार : 82 हजार 248
  • महिला मतदार : 1 लाख 63 हजार 654
  • मतदान केलेल्या महिला मतदार : 74 हजार 140
  • इतर मतदार : 56
  • मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 21

उल्हासनगर –

  • एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 57 हजार 367.
  • मतदान केलेले मतदार : 1 लाख 31 हजार 505, (एकूण टक्केवारी – 51.10 %.)
  • पुरुष मतदार संख्या : 1 लाख 39 हजार 848
  • मतदान केलेले पुरुष मतदार : 74 हजार 877
  • महिला मतदार संख्या : 1 लाख 17 हजार 422
  • मतदान केलेले महिला मतदार : 56 हजार 606
  • इतर मतदार संख्या : 97, मतदान केलेले इतर मतदार : 22.

कल्याण पूर्व –

  • एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 99 हजार 380, मतदान केलेले मतदार : 1 लाख 56 हजार 235 (एकूण मतदानाची टक्केवारी – 52.19 %).
  • पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 59 हजार 289, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 87 हजार 784,
  • महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 39 हजार 684, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 68 हजार 370,
  • इतर मतदारांची एकूण संख्या : 407. मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 81.

डोंबिवली –

  • एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 75 हजार 110, मतदान केलेले मतदार : 1 लाख 42 हजार 142 (मतदानाची टक्केवारी – 51.67 %).
  • पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 43 हजार 196, मतदान केलेले पुरुष मतदार : 78 हजार 023
  • महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 21 हजार 914, मतदान केलेल्या महिला मतदार : 64 हजार 119
  • इतर मतदारांची संख्या : 0, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 0.

कल्याण ग्रामीण –

  • एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 53 हजार 149, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 31 हजार 162 (एकूण मतदानाची टक्केवारी – 51.01 %).
  • पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 48 हजार 124, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 32 हजार‍ 216
  • महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 04 हजार 902, मतदान केलेल्या महिला मतदार : 98 हजार 910
  • इतर मतदार : 123, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 36.

मुंब्रा कळवा –

  • एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 43 हजार 661, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 16 हजार 159 (एकूण मतदानाची टक्केवारी – 48.72 %).
  • पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 37 हजार 113, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 1 लाख 18 हजार ‍013
  • महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 06 हजार 445, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 98 हजार 136
  • इतर मतदारांची एकूण संख्या : 103, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 10
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.