AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विलासराव देशमुखांचा जावई

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे जावई डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) पृथ्वीराज चव्हाणांविरोधात रिंगणात उतरणार आहेत.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विलासराव देशमुखांचा जावई
Follow us
| Updated on: Oct 01, 2019 | 1:47 PM

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार ठरला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे जावई डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosale) पृथ्वीराज चव्हाणांविरोधात रिंगणात उतरणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ही रंगतदार लढत होणार आहे.

अतुल भोसले हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या कन्येचे पती आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साताऱ्यात केली होती. आज भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली

कोण आहेत अतुल भोसले?

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त साताऱ्याची तयारी, युतीची मतदारसंघनिहाय विजयाची रणनीती

अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला, मात्र विलासकाका आणि अतुल भोसले यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

पंढरपुरात ठरलं, पृथ्वीबाबांना कराडमध्ये पाडायचं, अतुल भोसलेंना निवडायचं! 

कोण आहेत अतुल भोसले?

-अतुल भोसले सध्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत

-मूळचे कराडचे असलेल्या अतुल भोसलेंना मानणारा मोठा वर्ग कराडमध्ये आहे.

-अतुल भोसले यांनी 2014 मध्ये भाजपकडून कराड दक्षिण मतदारसंघातून, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.

-या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील उंडाळकर आणि अतुल भोसले अशी तिहेरी लढत होती.

-या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला होता, मात्र विलासकाक आणि अतुल भोसलेंनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

-पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती, तर विलासकाकांना 60 हजार 413 मतं आणि अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार 621 मतं मिळवली होती.

विलासरावांचे जावई

डॉ. अतुल भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. अतुल भोसले हे सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत. तसेच भोसले हे राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई आहेत, विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या अतुल भोसले यांची पत्नी आहेत.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.